'Mirzapur 3' च्या पोस्टरमध्ये दडलीय प्रदर्शित होण्याची तारीख, पाहा मिळतोय का Clue

| Published : Jun 10 2024, 01:18 PM IST / Updated: Jun 10 2024, 01:19 PM IST

mirzapur cover photo

सार

पंचायत सीझन-3 आणि गुल्लक सीझन-4 नंतर आता हिट वेब सीरिज मिर्झापुरचा सीझन-3 लवकरच प्रदर्शित होणार आहे. अशातच वेब सीरिजची डेट समोर आली असून तुम्हाला एक गेम पझल त्यासाठी सोडवावा लागणार आहे.

'Mirzapur 3' release date revealed : ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओकडून गेल्या काही दिवसांपासून मिर्झापूर-3 चे पोस्टर आणि व्हिडीओ प्रदर्शित करुन रिलिज डेटची सातत्याने प्रेक्षकांना हिंट देत आहेत. अशातच निर्मात्यांनी पुन्हा एकदा एक पोस्टर शेअर केले आहे. याच पोस्टरमध्ये बेव सीरिजची तारीख दडलीय असे म्हटले आहे.

पोस्टरमध्ये सीरिजची तारीख
अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओने नुकत्याच इंस्टाग्रामवर मिर्झापूर-3 च्या रिलीजच डेटची घोषणा केली आहे. पण तारीख जाणून घेण्यासाठी थोडी मेहनत करावी लागणार आहे. खरंतर, प्राइम व्हिडीओनो एक पोस्टर शेअर केले आहे त्यामध्ये सीरिजमधील पात्र दिसून येत आहेत.पोस्टरमध्ये गादीवर गुड्डू पंडितची भूमिका साकारलेला अली फजल बसलेला दिसून येत आहे. याच्या बाजूला एक मुलगी दिसतेय ती गोलू उर्फ श्वेता त्रिपाठी असल्याचे वाटत आहे. जमिनीवर कालीन भैय्या उर्फ पंकज त्रिपाठी, त्यांचा मुलगा मुन्ना भैय्या उर्फ दिव्येंदु दिसत आहे. अशाप्रकारे पोस्टरमध्ये एकूण सात पात्र असून यामध्येच तारीख दडलीय. याशिवाय पोस्टरच्या टॉपला मिर्झापूर-3 ची रिलीज डेट दडली असून शोधून दाखवा असेही म्हटले आहे.

View post on Instagram
 

मिर्झापूर-3 बद्दल थोडक्यात
स्टार कास्ट किंवा मिर्झापूर-3 च्या निर्मात्यांनी अद्याप रिलिज डेटसंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. पंकज त्रिपाठी आणि अली फजल व्यतिरिक्त सीरिजमध्ये रसिका दुग्गल, श्वेता त्रिपाठी देखील झळकणार आहे. मिर्झापूरचा पहिला सीझन वर्ष 2018, दुसरा सीझनचा प्रीमियर ऑक्टोंबर 2020 मध्ये झाला होता. या दोन्ही सीझनला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. अशातच प्रेक्षकांकडून मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा केली जात आहे.

आणखी वाचा : 

सोनाक्षी सिन्हा प्रियकर जहीर इकबालसोबत करणार लग्न? वेडिंग डेट आणि वेन्यूची माहिती आली समोर

Munjya Box Office Collection Day 3 : 'मुंज्या' सिनेमाची प्रेक्षकांवर छाप, 30 कोटींच्या कलेक्शनसाठी एवढे रुपये कमी