सार

Crime News In Marathi : अभिनेता भूपेंद्र सिंहने आपल्या शेजाऱ्यांवर गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचे आणखी दोन साथीदार फरार आहेत.

Crime News In Marathi : टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ‘मधुबाला’ मालिकेतील अभिनेता भूपिंदर सिंहने (TV actor Bhupinder Singh) एका तरुणावर गोळीबार करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली होती. या घटनेच्या तीन दिवसांनंतर पोलिसांनी त्याला बेड्या (Bhupinder Singh arrested) ठोकल्या आहेत. दरम्यान याप्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत. दुसरीकडे पोलिसांनी भूपिंदर सिंहकडून पिस्तूल-काडतुसे, लोखंडी रॉड व तलवार अशी शस्त्रे जप्त केली आहेत.

नेमके काय आहे प्रकरण?

भूपिंदर सिंह मुंबईहून आपल्या मूळ गावी गेला होता. यावेळेस शेताच्या बांधावर असलेल्या एका झाडावरून त्याचे शेजारी राहणाऱ्या गुरदीप सिंहशी भांडण झाले. दोघंही त्या झाडावर आपापला दावा करत होते. यानंतर हे प्रकरण इतके वाढले की भूपिंदर सिंह आणि गुरदीप यांच्यात टोकाचे भांडण झाले. रागाच्या भरात भूपिंदरने गोळीबार सुरू केला. या गोळीबारात गुरदीपचा 23 वर्षांचा मुलगा गोविंदचा (Govind Singh) मृत्यू झाला. तर गुरदीप (Gurdeep Singh), त्याची पत्नी आणि दुसरा मुलगा जखमी झाले आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

ही खळबळजनक घटना घडल्यानंतर गुरदीपच्या भावाने भूपिंदर सिंह आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एफआयआर दाखल केला. तपासाअंती पोलिसांना कळले की, यापूर्वीही गुरदीप व त्याच्या कुटुंबीयांनी भूपिंदर सिंहविरोधात तक्रार दाखल केली होती. असे असतानाही स्थानिक पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणूनच भूपिंदर सिंहची हिंमत अधिक वाढली. दरम्यान याप्रकरणी आता बिजनौरचे एसपी नीरज कुमार जदौन यांनी निष्काळजीपणाच्या आरोपावरून तीन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

भूपिंदर सिंहचे करिअर

भूपिंदर सिंहने '857 क्रांति', 'ये प्यार ना होगा कम', 'मधुबाला- एक इश्क एक जुनून', 'एक हसीना थी', 'तेरे शहर में', 'काला टीका' आणि 'रिश्तों का चक्रव्यूह' यासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यानं आपल्या करिअरची सुरुवात 'जय महाभारत' या मालिकेपासून केली होती.

आणखी वाचा :

Bollywood Update : गुटख्याच्या जाहिरातीत आता हा सुपरस्टार दिसणार नाही, कारण…

India vs AUS : शाहरुख खानने आशा भोसलेंचा वापरलेला कप उचलला, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

Nana Patekar : चाहत्याला मारल्याचा VIDEO VIRAL, नाना पाटेकरांनी हात जोडून मागितली माफी; म्हणाले…