सार

Ranbir Kapoor Animal On OTT : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ सिनेमा बॉक्सिऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सिनेरसिकांना लवकरच हा सिनेमा ओटीटीवरही पाहायला मिळणार आहे.

Ranbir Kapoor Animal On OTT : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) ‘अ‍ॅनिमल’ (Animal) सिनेमा बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने देशातील बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत जवळपास 400 कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रूपयांहून अधिक कमाई केल्याचे म्हटले जात आहे. ही घौडदौड सुरू असतानाच यादरम्यान ‘अ‍ॅनिमल’बद्दल आणखी एक धमाकेदार बातमी माहिती समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, ‘अ‍ॅनिमल’ सिनेमा लवकरच OTT प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित करण्यात येणार आहे. यासाठी तारीखही निश्चित केली गेलीय. पण OTT प्लॅटफॉर्मवर ‘अ‍ॅनिमल’ सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल. कारण हा चित्रपट 26 जानेवारी 2024 रोजी OTT वर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

View post on Instagram
 

या प्लॅटफॉर्मवर पाहू शकता ‘अ‍ॅनिमल’ (Animal) सिनेमा

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ (Animal) चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. दमदार अभिनयामुळे रणबीरच्या करिअरमधील ‘अ‍ॅनिमल’ हा सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक ठरला आहे. सिनेमाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित केला जाणार आहे. ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाचे ओटीटी अधिकार नेटफ्लिक्सने (netflix) विकत घेतले आहेत. तसेच निर्मात्यांकडून OTTवर सिनेमा रिलीज करण्यासाठी 26 जानेवारी 2024 हा दिवस निवडण्यात आला आहे.

View post on Instagram
 

रणबीर-रश्मिका पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र

दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीचा सिनेमा ‘अ‍ॅनिमल’मध्ये रणबीर कपूर आणि साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना (Ranbir Kapoor And Rashmika Mandanna movie) मुख्य भूमिका साकारत आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही नवी जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. 1 डिसेंबरला बॉक्सऑफिसवर (animal movie release date) झळकलेल्या या सिनेमाने भारतात आतापर्यंत 312 कोटी 96 लाख रूपयांची कमाई केलीय तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रूपयांहून अधिक कमाई केल्याचे म्हटले जात आहे. सिनेमामध्ये अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी या कलाकारांनीही महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

आणखी वाचा :

SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या

Bollywood Update : गुटख्याच्या जाहिरातीत आता हा सुपरस्टार दिसणार नाही, कारण…

India vs AUS : शाहरुख खानने आशा भोसलेंचा वापरलेला कप उचलला, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव