सार

जान कुमार सानूने बिग बॉस-14 मध्ये एन्ट्री कशी मिळाली याबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. त्याने कोलकात्यात जाऊन काळी जादू केल्याचे आणि बलिदान दिल्याचा धक्कादायक खुलासाही केला.

Entertainment : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक कुमार सानू (Kumar Sanu) यांच्या पहिल्या पत्नीला मुलगा जान कुमार सानू (Jaan Kumar Sanu) बिग बॉस-14 (Bigg Boss Season 14) मध्ये झळकला होता. काही वर्षांनंतर जान हा पारस छाबडाच्या पॉडकास्ट शोमध्ये झळकला. या वेळी काही धक्कादायक खुलासे झालेत. पारस छाबडाने आपल्या पॉडकास्टमध्ये जानला विचारले होते की, बिग बॉस-14 मध्ये नेपोटिज्मच्या आधारे एन्ट्री केली होती का? कारण तुझे वडील एक प्रसिद्ध गायक आहेत. यावर जानने उत्तर देत बिग बॉसच्या घरात कशाप्रकारे एन्ट्री केली याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

जानने केले धक्कादायक खुलासे
जानने म्हटले की, मी बिग बॉसमध्ये काळी जादू करुन आलो होतो. यासाठी मी कोलकाता येथे गेलो होते. कोलकातामध्ये एका महिलेला भेटलो. त्या महिलेने काही माकडे पाळली होती. महिलेशी संवाद करताना कळले की, ती माकडे नव्हती तर त्या व्यक्ती होत्या. त्या व्यक्तींना माकड बनवले होते. हे सर्व पाहिल्यानंतर मी योग्य ठिकाणी आलोय असे मला वाटले. महिलेने म्हटले की, तुला जे हवयं त्यासाठी बलिदान द्यावे लागेल. यामुळे मी काही बकरे आणि कोबड्यांचे बलिदान दिले. याशिवाय काळ्या रंगातील बाहुलीचा कशाप्रकारे काळी जादू करण्यासाठी वापर केला जातो हे देखील मी पाहिले आहे. माझा उद्देश मोठा असल्याने ते करावे लागले. यानंतर मी मुंबईत आलो आणि चार दिवसांनी मला बिग बॉसमधून फोन आला. यानंतर जानने खुलासा केला ही गोष्ट एक मजा होती.

कोण आहे जान सानू?
जान कुमार सानूचा जन्म 1994 मध्ये कोलकाता येथे झाला होता. जान एक गायक आणि म्युझिशियन आहे. जानने आमिर खानचा सिनेमा तारे जमीन पर, बम बम बोले सारखी गाणी गायली आहेत. याशिवाय काही बंगाली सिनेमांसाठीही गाणी गायली आहेत. जान सानू बिग बॉस 14 मध्येही झळकला होता. यावेळी काही धक्कादायक खुलासेही जानने केले होते. जानने म्हटले होते की, वडील कुमार सानू यांच्या सोबतच्या घटस्फोटानंतर आई रितानेच माझे पालनपोषण केले आहे.

आणखी वाचा :

सिनेमांवर टिका करण्यावरुन अक्षय कुमारने केले धक्कादायक विधान, म्हणाला...

अमृता फडणवीस यांचे नवे गाणे 'Saawan' प्रदर्शित, पाहा VIDEO