सार

बॉलिवूडमधील खिलाडी अक्षय कुमारचे सध्याचे सिनेमे बॉक्स ऑफिवर फिके पडल्याचे दिसून येत आहेत. यामुळे अक्षयला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले. अशातच अभिनेत्याने सिनेमांवरुन केल्या जाणाऱ्या टिकांवरुन एक विधान केले आहे. याच विधानाची सध्या चर्चा सुरु झाली आहे.

Akshay Kumar on Movie Criticism : बॉलिवूडमधील अभिनेता अक्षय कुमार त्याचा आगामी सिनेमा ‘खेल खेल मे’ (Khel Khel Mein) च्या प्रमोशनात व्यस्त आहे. अशातच अक्षयने सिनेमांसाठी केल्या जाणाऱ्या टिकांवर भाष्य केले आहे. अभिनेत्याने टिका केल्यानंतर त्या गोष्टीला कशा प्रकारे हँडल करतो याबद्दल सांगितले आहे. अक्षयने म्हटले की, "माझ्या सिनेमांसाठी टिका झाल्यानंतर पुढील सिनेमात सुधारणा करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो."

अक्षय कुमारचे टिकांवरील मत
अक्षय कुमारने म्हटले की, एखाद्याचे बॅकग्राउंड काय आहे अथवा त्याने आयुष्यात काय केले? टिका दोन प्रकारे केल्या जातात. पहिली म्हणजे व्यक्तिगत आणि दुसरी म्हणजे व्यक्तीला वाटत असते समोरच्याने सुधारणा करावी. जे तो मनापासून त्याला सांगत असतो. यामुळे मला टिका केलेल्या आवडतात. या गोष्टीला मी सकारात्मक दृष्टीने पाहतो. त्याबद्दल समजून घेतो आणि त्या दिशेने काम करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळेस टिका झाल्यानंतर माझ्यामध्ये बदल करण्याचाही प्रयत्न केला आहे.

प्रेक्षकांना समजून घेत सिनेमे करणार- अक्षय कुमार
अक्षय कुमारने पुढे म्हटले की, लोक काहीही म्हणाले तरीही आपल्याला त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासोबत वेगवेगळे सिनेमे करणे कधीच सोडणार नाही. कारण मला वाटते की, प्रेक्षकांना जे हवेय ते देऊ शकतो.

अक्षयचा आगामी सिनेमा
अक्षय कुमारचा आगामी सिनेमा खेल खेल मे येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची कथा सात मित्रांची आहे. जे एका डिनर पार्टीसाठी एक ट्विस्टसह एकत्रित भेटतात. यापुढे जे घडते हे पाहण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहांमध्ये जाऊन सिनेमा पहावा लागणार आहे.

View post on Instagram
 

सिनेमातील स्टार कास्ट
खेल खेल मे सिनेमात अक्षय कुमारसह वाणी कपूर, तापसी पन्नू, फरदीन खानसह काही कलाकार झळणार आहेत. सिनेमासाठी अक्षय कुमारने 60 कोटी रुपयांची फी वसूल केल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा : 

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर Stree-2 सिनेमासाठी अ‍ॅडवान्स बुकिंग सुरू

अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटासाठी एक डॉक्टर ठरलाय कारण?