सार

भारतातील पश्चिम बंगालमधील भरतनाट्यम आणि कुचिपुडी नृत्यकलाकार अमरनाथ घोष याच्यावर अमेरिकेत गोळीबार करत हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती घोष याची मैत्रीण आणि टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने दिली आहे.

Indian Dancer Killed in US : टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने शुक्रवारी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये देवोलिनाने अमेरिकेतील मिसूरी प्रांतातील भारतीय  नृत्यकलाकार अमरनाथ घोष (Amarnath Ghosh)  याची हत्या करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पुढे देवोलिनाने म्हटले की, 27 फेब्रुवारीला अमरनाथ सेंट लुइस अकादमीच्या आसपास फिरत होता. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
देवोलिनाने 1 मार्चला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा मित्र आणि प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यकलाकार अमरनाथ घोषच्या हत्येची माहिती दिली. याशिवाय देवोलिनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर (S. Jayshankar) आणि अमेरिकेतील भारतीय दूतवासाने या प्रकरणात अधिक तपास करावा अशी मागणी केली आहे.

दरम्यान, अमरनाथ घोष परिवारातील एकटा व्यक्ती होता. त्याच्या आईचे तीन वर्षांआधी निधन झाले होते. याशिवाय बालपणीच वडिलांनी आईची साथ सोडली होती. अमरनाथच्या मृतदेहाची ओखळ त्याच्या मित्राने पटवली आहे.

अमेरिकेत शिक्षण घेत होता
अमेरिकेतील मिसूरी प्रांतातील सेंट लुइस येथे राहून वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीत अमरनाथ नृत्यात मास्टर ऑफ फाइन आर्ट्सचे शिक्षण घेत होता. मंगळवारी (27 फेब्रुवारी) संध्याकाळी अमरनाथ फिरत होता. त्यावेळीच एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार करत हत्या केली. हल्लेखोराने अमरनाथवर एक नव्हे काही राउंड फायरिंग केली.

भारतीय कलाकारांवर सातत्याने हल्ले
अमेरिकेत भारतीय गायक आणि कलाकारांच्या हत्येची प्रकरणे दिवसागणिक वाढत चालली आहेत. याआधी, अमेरिकेतील गुरुद्वाराबाहेरील एका शीख भारतीय संगीत कलाकाराची हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण वर्ष 2023 मधील आहे. या घटनेनंतर भरतनाट्यम कलाकाराची हत्या करण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

बॉलिवूडमधील या अभिनेत्र्यांकडून गरजूंना केली जाते कोट्यावधींची मदत

अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा कुठे आहेत? कोर्टाने घोषित केले फरार

रणवीर सिंहच्या DON 3 सिनेमाचे बजेट ऐकून व्हाल हैराण