India

Uttar Pradesh

अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा कुठे आहेत? कोर्टाने घोषित केले फरार

Image credits: facebook

कोर्टाने घोषित केले फरार

बॉलिवूडमधील अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांना उत्तर प्रदेशातील रामपुर कोर्टाने फरार घोषित केले आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया...

Image credits: instagram

आचार संहितेचे उल्लंघन

वर्ष 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान रामपुर जागेवरुन भाजपच्या उमेदवार राहिलेल्या जयाप्रदा यांच्यावर आचार संहितेचा उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Image credits: instagram

सात वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी

जयाप्रदा यांच्या विरोधात सात वेळा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. तरीही जयाप्रदा कोर्टात हजर न झाल्याने त्यांना फरार घोषित केले आहे.

Image credits: facebook

6 मार्चपर्यंत कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश

एमपी एमएलए कोर्टाने पोलिसांना 6 मार्चपर्यंत जयाप्रदांना हजर करा असे आदेश दिले आहेत. यासाठी पोलीस उपअधीक्षकांच्या नेतृत्वाखील टीम तयार करण्यास सांगितले आहे.

Image credits: instagram

पोलिसांकडून तपास केला जाणार

जयाप्रदा यांना शोधण्याची जबाबदारी पोलिसांकडे देण्यात आली आहे. यामुळे कोर्टासमोर हजर करण्यासाठी पोलिसांकडून जयाप्रदा यांचा शोध घेण्यास सुरुवात झाली आहे.

Image credits: facebook