Explained : Hardik Pandya आणि Natasa Stankovic यांच्यामध्ये घटस्फोट का झाला?
- FB
- TW
- Linkdin
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांचा घटस्फोट
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांनी संयुक्तपणे एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांनी घटस्फोटाची घोषणा करत सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.
आयपीएलपासून रिलेशनशिपमध्ये धुसफूस असल्याची चर्चा सुरू
नताशा आणि हार्दिकमध्ये सर्वकाही ठिक नसल्याच्या चर्चांना उधाण आयपीएल 2024 पासून सुरू झाल्या होत्या. याआधी नताशा हार्दिकच्या प्रत्येक सामन्यावेळी क्रिकेटच्या मैदानात त्याला चिअरअप करण्यासाठी यायची. पण अचानक सामान्यांना सातत्याने अनुपस्थिती लावत असल्याचे दिसून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
नताशाने इंस्टाग्रावरील पांड्या आडनाव हटवले
नताशा आणि हार्दिकने सोशल मीडियात एकमेकांसंदर्भातील पोस्ट शेअर करणे बंद केलो होते. याशिवाय नाताशाने आपल्या इंस्टाग्रामवरील प्रोफाइलवरुन तिचे पांड्याचे आडनाव हटवले. यादरम्यान, हार्दिकने नताशाच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट लाइक करणे बंद केले.
हार्दिक पांड्या आणि नताशाने पब्लिक अपिअरन्स टाळले
हार्दिक पांड्या आणि नताशा दीर्घकाळापासून सार्वजिक ठिकाणी एकमेकांसोबत जाणेही टाळत होते. यावरुनच दोघांच्या नात्यामध्ये धुसफूस सुरू झाल्याची चर्चा रंगली.
नताशाचे हार्दिकच्या भावासोबतचे नातेसंंबंध
वैवाहिक आयुष्यात वाद सुरू असताना नताशाने हार्दिकचा भाऊ कृणाल आणि त्याची पत्नी पंखुरी शर्मा यांच्यासोबत नातेसंबंध कायम ठेवले होते. यामुळे नताशा आणि हार्दिकमध्येच वाद होता हे दिसून आले.
हार्दिकसोबतची साथ सोडल्याची चर्चा
नताशा काही महत्वाच्या क्रिकेट सामान्यांवेळीही अनुपस्थितीत राहिली. वर्ल्ड टी-20 असो किंवा आयुष्यातील काही संघर्षात्मक स्थिती यावेळीही नताशा हार्दिकसोबत दिसली नाही.
नाते टिकवण्याचा प्रयत्न पण....
हार्दिक पांड्या आणि नताशाने घटस्फोटाची घोषणा करत म्हटले की, आम्ही दोघांनी नाते टिकवण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. पण आता एकमेकांच्या सहमतीने आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुलाबद्दलचा कपलने घेतला निर्णय
हार्दिक पांड्याने मुलगा अगस्त्य यांच्याबद्दल सांगत म्हटले की, “आम्ही मुलाबद्दल स्वत:ला भाग्यवान समजतो. तो नेहमीच आमच्या आयुष्यातील महत्वाचा हिस्सा राहिल. त्याची काळजी आम्ही दोघेही मिळून घेणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. अपेक्षा करतो, तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा मान राखाल.”
आणखी वाचा :
नताशा आणि हार्दिक पांड्या एकमेकांपासून चार वर्षांनी विभक्त, सोशल मीडियावर शेअर केली भावूक पोस्ट