सार

Hardik Pandya and Natasa Divorce : बॉलिवूडमधील अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्याने त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात दोघांनी एक पोस्ट शेअर केली आहे.

Hardik Pandya and Natasa Divorce : हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्यामधील घटस्फोटाच्या चर्चा रंगत होत्या त्यांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कपलने आम्ही एकमेकांपासून विभक्त होत घटस्फोट घेत असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सध्या नताशा तिच्या आईच्या घरी आहे. तिच्यासोबत मुलगाही आहे.

नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनकोविक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा आयपीएलपासून सुरु झाल्या होत्या. खरंतर, टुर्नामेंटदरम्यान हार्दिक पांड्यासंदर्भात अनेकांनी वाईट कमेंट्स केल्या होत्या. यावर नताशाने काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. याशिवाय आयपीएलच्या एकही सामन्यांवेळी नताशा क्रिकेटच्या मैदानात हार्दिकला चिअरअप करताना दिसली नाही. यानंतर टी-20 वर्ल्ड कपनंतरही नताशाने हार्दिकसंदर्भात कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. एवढेच नव्हे अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या लग्नातही हार्दिक एकटाच दिसला. लग्नसोहळ्यात हार्दिक भावासोबत आल्याचे दिसून आले. यावेळी हार्दिक पांड्याने खूप धम्माल केली. 

दरम्यान, नताशा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घटस्फोटासंदर्भातील हिंट सोशल मीडियातून देत होती. याआधी अनेकवेळा नताशाने काही कोट्स असो किंवा बायबलमधील नात्यासंदर्भातील महत्वाचा मेसेजमधून तिने सेल्फ लव्ह आणि सेल्फ केअरबद्दलचे वक्तव्य केली होती. दुसऱ्या बाजूला हार्दिकने घटस्फोटासंदर्भात सुरु असलेल्या चर्चांवर मौन धरले होते. 

हार्दिक पांड्याची भावूक पोस्ट
हार्दिक पांड्याने घटस्फोटाची घोषणा करत सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. हार्दिकने म्हटले की, “घटस्फोटाचा निर्णय आमच्या दोघांसाठी घेणे सोपे नव्हते. याशिवाय चार वर्ष एकत्रित राहिल्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाआधी आम्ही दोघांनी नाते टिकवून ठेवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. पण अखेर आम्ही योग्य निर्णय घेतला आहे.”

View post on Instagram
 

मुलाबद्दलचा कपलने घेतला निर्णय
हार्दिक पांड्याने मुलगा अगस्त्य यांच्याबद्दल सांगत म्हटले की, “आम्ही मुलाबद्दल स्वत:ला भाग्यवान समजतो. तो नेहमीच आमच्या आयुष्यातील महत्वाचा हिस्सा राहिल. त्याची काळजी आम्ही दोघेही मिळून घेणार आहोत. त्याच्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहू. अपेक्षा करतो, तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा मान राखाल.”

आणखी वाचा : 

रिचा चड्ढा-अली फजलच्या घरी गोड चिमुकलीचे आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

बाथरुम व्हिडीओ लीक झाल्याने भडकली उर्वशी, मॅनेजरला सुनावत असल्याचा Audio व्हायरल