Bollywood Update : दबंग सलमान खानच्या हिरोईनला जीवे मारण्याची धमकी? नेमके काय आहे सत्य

| Published : Dec 14 2023, 05:02 PM IST / Updated: Dec 14 2023, 05:24 PM IST

Pooja Hegde

सार

Pooja Hegde News : बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडेला दुबईमध्ये जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. हे वृत्त समजल्यानंतर पूजाच्या चाहत्यांनी काळजी व्यक्त करत तिच्यावर कोणतेही संकट ओढावू नये यासाठी प्रार्थनाही करू लागले आहेत.

Pooja Hegde News : प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेला (Pooja Hegde) जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार, पूजा दुबईमध्ये एका क्लबच्या उद्घाटनासाठी पोहोचली होती. यादरम्यान काही मुद्यांवरून दुबईत तिचे जोरदार वाद झाले आणि यामुळेच तिला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे म्हटले जात आहे. 

हे धक्कादायक वृत्त समजल्यानंतर चाहतेमंडळी तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान हा कार्यक्रम पार पडल्यानंतर पूजा भारतात परतली देखील आहे.

नेमके काय आहे सत्य?

अभिनेत्री पूजा हेगडेच्या (Pooja Hegde News) टीमने हे वृत्त फेटाळून लावले आहे. अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे तिच्या टीमने स्पष्ट केले आहे. ही फेक न्यूज कोणी दिली हे आम्हाला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया पूजाच्या टीमने दिली आहे.

View post on Instagram
 

पापाराझी विरल भयानीने सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करत म्हटले होते की, अभिनेत्री पूजा हेगडेला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यानंतर हे वृत्त सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरले. चाहत्यांमध्ये गोंधळ उडाल्याचे लक्षात येताच विरल भयानीने पोस्ट डिलीट केली आहे.

View post on Instagram
 

पूजा हेगडेचे आगामी सिनेमे

पूजा हेगडे बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानसोबत (Salman Khan) ‘किसी का भाई किसी की जान’ या सिनेमामध्ये झळकली होती. हा सिनेमा यावर्षी एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. लवकरच पूजा अभिनेता शाहिद कपूरसोबत ‘देवा’ सिनेमामध्येही दिसणार आहे. वर्ष 2024मध्ये ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. तिचे चाहते 'देवा' सिनेमासह 'हाऊसफुल 5' या सिनेमाचीही आतुरतेने वाट पाहत आहेत.

View post on Instagram
 

आणखी वाचा

प्रभाससोबत बिग बजेट सिनेमात ‘अ‍ॅनिमल’फेम TRIPTI DHIMRIची एण्ट्री?

BOX OFFICEनंतर रणबीर कपूरचा ‘Animal’ OTTवरही धुमाकूळ घालणार, जाणून घ्या DETAILS

दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग, महिला जखमी