बाहुबली सिनेमातील अभिनेता प्रभाससोबत 400 कोटी रुपयांच्या सिनेमात ‘अॅनिमल’ सिनेमातील अभिनेत्री तृप्ती डिमरीची एण्ट्री?
अॅनिमल सिनेमामध्ये अभिनेत्री तृप्ती डिमरीने 'झोया' नावाचे पात्र साकारले आहे. ही भूमिका फार मोठी नसली तरीही तिने शानदार काम केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप रेड्डी वांगाच्या आगामी सिनेमा 'स्पिरीट'मध्येही तृप्ती डिमरी झळकणार आहे.
अॅनिमल सिनेमानंतर वांगाने 'स्पिरीट' या आपल्या आगामी सिनेमाचे काम हाती घेतले आहे. या सिनेमाचे बजेट 400 कोटी रुपये असल्याची माहिती आहे.
स्पिरीट सिनेमामध्ये प्रभास आणि तृप्ती डिमरीव्यतिरिक्त अनंत नाग आणि तृषा कृष्णन देखील दिसणार आहेत.
रिपोर्ट्सनुसार, अॅनिमल सिनेमामध्ये शानदार अभिनय केल्यानंतर आता 'स्पिरीट' सिनेमामध्ये तृप्ती डिमरीची प्रमुख अभिनेत्री म्हणून निवड करण्यात आली आहे.
तृप्तीने अॅनिमल सिनेमासाठी ऑडिशन दिले होते. तिच्यातील अभिनयाचे टॅलेंट पाहून संदीप रेड्डी वांगा व त्यांच्या टीमने 'झोया' पात्रासाठी तिची निवड केली.
स्पिरीट सिनेमातील तृप्तीच्या भूमिकेबाबत अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
स्पिरीट सिनेमामध्ये प्रभास एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे तृप्तीची भूमिकाही तितकीच दमदार असल्याचे म्हटले जात आहे.
तृप्ती डिमरीने आपल्या करिअरची सुरुवात 'मॉम'(Mom) सिनेमाद्वारे केली होती.
सोनाली कुलकर्णीचा दुबईतील नव्या घरात DIWALI PADWA 2023, नवीन लुक VIRAL
शाहरुख, दीपिकाचे ड्रेसिंग स्टाइल ठरवणारी ती आहे तरी कोण?
कोण आहे ORRY? ज्याची अंबानींपासून ते बॉलिवूडकरांसोबत आहे खास मैत्री
बॉलिवूड अभिनेत्रीचा रेड हॉट लुक, चाहते झाले घायाळ