धर्मवीर-2 च्या ट्रेलर लाँचवेळी सलमान-गोविंदाची 17 वर्षानंतर एकाच स्टेजवर गळाभेट

| Published : Jul 21 2024, 01:17 PM IST

Dharamveer 2 Trailer Launch
धर्मवीर-2 च्या ट्रेलर लाँचवेळी सलमान-गोविंदाची 17 वर्षानंतर एकाच स्टेजवर गळाभेट
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Dharamveer 2 Trailer Launch : ‘धर्मवीर-2’ सिनेमाच्या ट्रेलरचा नुकताच लाँचिंग सोहळा पार पडला. यावेळी बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थितीत लावली. पण सलमान खान आणि गोविंदा तब्बल 17 वर्षानंतर एकाच स्टेजवर भेटल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Dharamveer 2 Trailer Launch : मराठी सिनेसृष्टीतील आगामी सिनेमा धर्मवीर-2 ची सध्या जोरदार चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी सिनेमाचे पोस्टर बॉबी देओल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले होते. आता धर्मवीर-2 सिनेमाचा ट्रेलर 20 जुलैला रिलीज करण्यात आला. यावेळी बॉलिवूडमधील कलाकार गोविंदा, जीतेंद्र आणि सलमान खान एकत्रित दिसून आले. यावेळाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सलमानसह बॉलिवूड कलाकार ट्रेलर लाँचवेळी उपस्थितीत
धर्मवीर-2 सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी सलमान खानसह सुपरस्टार जीतेंद्र, बोमन इराणी, गोविंदा यांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थितीत होते. ट्रेलर लाँचिंगवेळी सलमान खानला शॉल आणि पुष्पगुच्छ देत स्वागत केले.

सलमान खान आणि गोविंदाची गळाभेट
सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सलमान खानने सर्वप्रथम जीतेंद्र यांची गळाभेट घेत अन्य पाहुण्यांचीही भेट घेतली. यानंतर गोविंदाची भेट घेत सलमानने 17 वर्षांनंतर त्याच्यासोबत एकाच स्टेजवर गळाभेट घेतली. यावेळी गोविंदाने पांढऱ्या रंगातील टी-शर्ट, मॅचिंग पँट आणि निळ्या रंगातील ब्लेझर परिधान केला होता. सलमान आणि गोविंदाचा व्हिडीओ पाहून चाहत्यांकडून वेगवेळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

View post on Instagram
 

धर्मवीर-2 सिनेमाचा ट्रेलर
वर्ष 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या धर्मवीर सिनेमाचा सिक्वल असणारा धर्मवीर-2 सिनेमा येत्या 9 ऑगस्टला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमाची कथा दिवंगत शिवसेने नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सिनेमात आनंद दिघे यांची प्रसाद ओक याने भूमिका साकारली होती.

धर्मवीर-2 सिनेमाची निर्मिती झी-स्टुडिओज आणि साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. सिनेमाची कथा-पटकथा आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केली आहे. खरंतर, सिनेमाच्या ट्रेलरमध्ये असे काही डायलॉग्स आहेत जे हिंदूत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसत आहेत. यामुळे थेट निशाणा उद्धव ठाकरेंवर आहे का अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

YouTube video player

आणखी वाचा : 

विक्की कौशलच्या Bad Newz सिनेमाची दुसऱ्या दिवशी तगडी कमाई

अभिषेक-ऐश्वर्या विभक्त होण्यासाठी ही अभिनेत्री ठरली कारणीभूत?