Deepika Padukone Birthday : दीपिकाने 'ओम शांती ओम' नव्हे तर या सिनेमातून केले होते सिनेसृष्टीत पदार्पण

| Published : Jan 05 2024, 11:18 AM IST / Updated: Jan 05 2024, 11:29 AM IST

Deepika Padukone

सार

बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री दीपिका पादुकोण आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाचे वर्षही दीपिकासाठी धमाकेदार असणार आहे. पण तुम्हाला माहितेय का, दीपिका पादुकोणच्या पहिल्या सिनेमाचे नाव काय होते?

Deepika Padukone Birthday : 5 जानेवारी 1986 रोजी जन्मलेली दीपिका पादुकोण आज 37 वर्षांची झाली आहे. दीपिका हीचा जन्म डेन्मार्कमधील कोपेनहेगनमधील असला तरीही ती कर्नाटकातील बंगळरूतील आहे. दीपिकाच्या सिनेसृष्टीतील करियरबद्दल बोलायचे झाल्यास तिने या क्षेत्रात वर्ष 2006 पासून सुरूवात केली होती. 

बहुतांशजणांना वाटते की, दीपिकाने आपल्या सिनेसृष्टीतील करियरची सुरुवात शाहरुख खान याच्यासोबत वर्ष 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमातून केली होती.खरंतर दीपिकाचा पहिला सिनेमा कन्नड भाषेतील होता. 

ऐश्वर्या' (Aishwarya) सिनेमातून दीपिकाने सिनेसृष्टीत पहिल्यांदा पदार्पण केले होते. ऐश्वर्या सिनेमा वर्ष 2006 मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर दीपिकाने बॉलिवूड सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. अभिनेता शाहरुख खान याच्यासोबत दीपिकाने बॉलिवूडमधील पहिला सिनेमा 'ओम शांती ओम' (Om Shanti Om) केला होता.

गायक हिमेश रेशमियाच्या म्युझिक व्हिडिओमध्येही दिसलीय दीपिका
दीपिका गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याच्या म्युझिक व्हिडिओ 'नाम है तेरा तेरा' (Naam Hai Tera Tera) मध्ये देखील झळकली होती. काही रिपोर्ट्सनुसार, दीपिका दिग्दर्शक संजय लीला भंन्साळी यांचा सिनेमा 'सांवरिया' (Saawariya) मधून पदार्पण करणार होती. पण काही कारणास्तव दीपिकाला त्या सिनेमात करण्याची संधी मिळाली नाही.

बॅडमिंटनपटूही आहे दीपिका
दीपिका पादुकोणने टूथपेस्ट ब्रॅण्डसाठीही मॉडलिंग केले आहे. याच्या माध्यमातून दीपिकाला खूप प्रसिद्धी मिळाली. अभिनेत्री असण्यासह दीपिका एक उत्तम बॅडमिंटनपटूही आहे. दीपिकाने राष्ट्रीय स्तरावर बॅडमिंटन स्पर्धा देखील खेळल्या आहेत.

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : इरा खानने भर लग्नमंडपातच पती नुपूरला दिला हा सल्ला, पाहा VIDEO

दीपिका पदुकोणला आई व्हायचंय? अभिनेत्री म्हणाली...

Hit And Run प्रकरणात अडकले गेलेत हे बॉलिवूड सेलेब्स