Ira Khan-Nupur Shikhare Wedding : आयरा खानने भर लग्नमंडपातच पती नुपूरला दिला हा सल्ला, पाहा VIDEO

| Published : Jan 04 2024, 01:51 PM IST / Updated: Jan 08 2024, 12:35 PM IST

Ira Khan-Nupur Shikhare Wedding

सार

Ira Khan Wedding : अभिनेता आमिर खान याची लेक आयरा खान हिने 3 जानेवारीला (2024) आपला पार्टनर नुपूर शिखरे याच्यासोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या विवाहसोहळ्याचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहेत.

Ira Khan-Nupur Shikhare Wedding : बॉलिवूडमधील मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर  खानच्या (Amir Khan) लेकीचा विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला. अशातच आता आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नाचे काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

लग्नसोहळ्यासाठी नुपूर हा अनोख्या अंदाजात विवाहस्थळी पोहचल्याने त्याच्याबद्दल जोरदार चर्चा होत आहे. खरंतर नुपूर जिमच्या कपड्यांवर धावत मुंबईतील ताज लँन्ड अ‍ॅण्ड हॉटेलमध्ये (Taj Lands End) पोहोचला होता. येथे आल्यानंतर नुपूरने मित्रांसोबत ढोलच्या तालावर डान्स करत हॉटेलमध्ये एण्ट्री केली. ऐवढेच नव्हे तर कपडे न बदलता आयरा सोबत रजिस्टर पद्धतीने लग्न केले.

View post on Instagram
 

आयरा आणि नुपूरच्या लग्नामधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आयरा पती नुपूरला आंघोळ करण्यास सांगत असल्याचे दिसून येत आहे. यावेळी आयराच्या हातात माइक असून ती लग्नाच्या स्टेजवर उभी असल्याचेही दिसतेय. याशिवाय आई रीना दत्ता, आमिर खान आणि सासूही स्टेजवर उभी असल्याचे दिसत आहे.

VIDEO :  इराने पतीला भर मंडपात दिलायं सल्ला, पाहा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत….

View post on Instagram
 

खान परिवार एकत्रित
आयरा आपल्या लग्नासाठी निळ्या आणि गुलाबी रंगातील ट्रेडिशनल आउटफिट परिधान केले होते. इराच्या विवाहासाठी संपूर्ण खान परिवार एकत्रित दिसून आला. यावेळी आमिर खान आणि त्याच्या दोन्ही एक्स पत्नी रीना दत्ता आणि किरण राव उपस्थितीत होत्या. आयरा ही आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे. पण आयराचे किरण रावसोबतही उत्तम नातेसंबंध आहेत.

View post on Instagram
 

 

View post on Instagram
 
View post on Instagram
 
View post on Instagram
 

आणखी वाचा: 

Ira Khan-Nupur Shikharee Wedding : आमिर खानच्या लेकीचा महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडणार लग्नसोहळा, या ठिकाणी होणार रिसेप्शन

दीपिका पदुकोणला आई व्हायचंय? अभिनेत्री म्हणाली...

Hit And Run प्रकरणात अडकले गेलेत हे बॉलिवूड सेलेब्स