सार

Vicky Kaushal Sam Bahadur Teaser Release : अभिनेता विकी कौशलचा बहुप्रतीक्षित ‘सॅम बहादुर’ सिनेमाबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिनेमाचे नवे पोस्टर अभिनेत्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

 

Vicky Kaushal Sam Bahadur Teaser Release Date : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित आगामी सिनेमा ‘सॅम बहादुर’शी (Sam Bahadur) संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विकीने गुरुवारी (12 ऑक्टोबर 2023) सिनेमाचे नवे पोस्टर शेअर करत तो साकारत असलेल्या पात्राची झलक आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली. 

या चित्रपटात विकी भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ (India’s first Field Marshal Sam Manekshaw) यांची भूमिका साकारत आहे.

View post on Instagram
 

टीझर कधी रिलीज होणार?

रिपोर्ट्सनुसार, ‘सॅम बहादुर’ सिनेमाचा टीझर 13 ऑक्टोबरला रिलीज करण्यात येणार आहे. मेघना गुलजार (Meghna Gulzar) दिग्दर्शित सिनेमामध्ये खऱ्या जीवनातील हीरोची कहाणी (Sam Manekshaw : The First Field Marshal Of The Indian Army) प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटात विकीचा एकदम हटके लुक त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे. येत्या 1 डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित सिनेमा (Sam Bahadur based on the life of Field Marshal Sam Manekshaw)

विकी कौशलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टरच्या (Sam Bahadur: Vicky Kaushal shares new poster) माध्यमातून ‘सॅम बहादुर’ चित्रपटातील तो साकारत असलेल्या व्यक्तिरेखेची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. विकीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो लष्कराच्या गणवेशात दिसत आहे. या पोस्टरवर ‘ज़िंदगी उनकी, इतिहास हमारा’ असेही लिहिले आहे.  

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमानंतर ‘सॅम बहादुर’मध्ये विकी पुन्हा एकदा दमदार भूमिका निभावत असल्याने (Vicky Kaushal As Sam Manekshaw) त्याचा हा नवा सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.   

चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

विकी कौशलच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिलेय की, “सर, आम्ही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहोत. कृपया चित्रपट लवकर प्रदर्शित करा”.  

विकी कौशलचे बॉलिवूडमधील करिअरच

विकीच्या चाहत्यांना आणि सिनेरसिकांना  ‘सॅम बहादुर’ सिनेमाकडून फार अपेक्षा आहेत. कारण विकीने वर्ष 2015 मध्ये रिलीज झालेल्या ‘मसान’ सिनेमामध्ये मुख्य भूमिका निभावली होती. यानंतर त्यानं ‘राझी’, ‘संजू’, ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘गोविंदा नाम मेरा’, ‘सरदार उधम’, ‘जरा हटके जरा बचके’ यासारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका निभावल्या. 

या चित्रपटांत शानदार अभिनय करून त्याने सिनेरसिकांचे मन जिंकले. पण काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला त्याचा सिनेमा ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ (The Great Indian Family Movie) बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला.

आणखी वाचा 

Animal New Song Hua Mai: रणबीर कपूरने 14 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत केले लिपलॉक, VIDEO VIRAL 

रणबीर कपूर 'राम' तर हा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका

बॉलिवूडचा किंग SHAHRUKH KHANच्या जीवाला धोका, धमक्यांनंतर मिळालं Y PLUS सुरक्षाकवच