सार

Animal New Song Hua Mai: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर व अभिनेत्री रश्मिका मंदानाची फ्रेश जोडी ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाच्या निमित्ताने सिनेरसिकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. सिनेमातील गाण्यामधील या दोघांच्या लिपलॉक सीनची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  

 

Animal New Song Hua Mai : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) स्टारर ‘अ‍ॅनिमल’ सिनेमाचे पहिले गाणं 'हुआ मैं' (Animal Song Hua Mai) रिलीज करण्यात आले आहे. या गाण्यामधील रणबीर-रश्मिकाच्या रोमँटिक केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. 

विशेषतः या दोघांमधील लिपलॉकचा (Hua Main Song Ranbir Kapoor and Rashmika Mandanna passionate romance) सीन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या रोमँटिक गाण्याचे गीतकार मनोज मुंतशिर शुक्ला आहेत तर प्रीतमने हे गाणं संगीतबद्ध केले आहे. या सुंदर गाण्याच्या माध्यमातून सिनेमातील रणबीर व रश्मिकाची लव्ह स्टोरी चित्रित करण्यात आली आहे.

‘अ‍ॅनिमल’ सिनेमातील रोमँटिक गाणे

सिनेमामध्ये रणबीर कपूर ‘अर्जुन’ आणि रश्मिका मंदाना ‘गीतांजली’ नावाचे पात्र साकारत आहे. 'हुआ मैं' (Animal song Hua Main out now) या गाण्याच्या सुरुवातीस गीतांजली आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना रणबीरसोबतच्या रिलेशनशिपबद्दल माहिती देत असल्याचे दिसतेय. 

पण रणबीरसोबत प्रेमसंबंधात असल्याने कुटुंबीय तिला चांगलंच खडसावतात. यास प्रत्युत्तर म्हणून अर्जुन-गीतांजली त्यांच्यासमोरच एकमेकांना किस करतात. या सीननंतरच रोमँटिक गाणे सुरू होते आणि गाण्यातच दोघं लग्नबंधनातही अडकताना दिसताहेत.

 ‘अ‍ॅनिमल’ सिनेमातील ‘हुआ मैं’ गाण्याचा VIDEO (ANIMAL HUA MAIN SONG VIDEO)

ANIMAL: HUA MAIN (Song) | Ranbir Kapoor | Rashmika M | Sandeep V | Raghav,Manoj M | Bhushan K

‘अ‍ॅनिमल’ सिनेमा 1 डिसेंबरला होणार रिलीज

‘अ‍ॅनिमल’ सिनेमाची प्रोडक्शन कंपनी टी-सीरिजने 'हुआ मैं' (Hua Main Animal Song) गाणे यू-ट्युबवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ‘प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते’ (प्यार की कोई सीमा नहींl). सिनेरसिकांकडूनही गाण्यास खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. दरम्यान सिनेमाचे दिग्दर्शन 'कबीर सिंग' फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाने केले आहे. सिनेमाची कहाणी देखील त्यांनीच लिहिलीय. 

सिनेमामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदानाव्यतिरिक्त अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, शक्ती कपूर, सुरेश ओबेरॉय आणि सौरभ सचदेवा यासारख्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा सिनेमा 1 डिसेंबरला (Animal Movie Release Date) बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.

आणखी वाचा :

रणबीर कपूर 'राम' तर हा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका

Animal New Poster : रणबीर कपूर-रश्मिका मंदानाचे लिपलॉक, चाहत्यांनी व्यक्त केला संताप

Shehnaaz Gill : शहनाज गिल हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमके काय झाले-कशी आहे प्रकृती? चाहत्यांना स्वतःच दिले Health Updates