Ramayana 2024 : रणबीर कपूर 'राम' तर हा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका
Entertainment Oct 11 2023
Author: Harshada Shirsekar Image Credits:Social Media
Marathi
रणबीर कपूरची रामायणात मुख्य भूमिका
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या 'रामायण' सिनेमात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. रणबीर या सिनेमात भगवान रामाची भूमिका साकारणार आहे.
Image credits: Social Media
Marathi
अधिकृत घोषणा नाही
नितेश तिवारी यांच्या सिनेमाबाबत अधिकृतरित्या अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. पण सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू आहेत.
Image credits: Social Media
Marathi
सनी देओलची खास भूमिका?
रिपोर्ट्सनुसार, सनी देओल सिनेमामध्ये हनुमानाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Image credits: Social Media
Marathi
निर्मात्यांचे काय आहे म्हणणे?
सूत्रांच्या माहितीनुसार, 'हनुमान हे शक्तीचे प्रतीक आहेत आणि त्यामुळेच या भूमिकेसाठी सनी देओलपेक्षा अन्य कोणताही पर्याय उत्तम ठरणार नाही'.
Image credits: Social Media
Marathi
सनी देओल आहे उत्सुक
सूत्रांच्या माहितीनुसार, सनी देओलने सिनेमामध्ये काम करण्याची इच्छ व्यक्त केली आहे आणि भगवान हनुमानाची भूमिका साकारण्यासाठी तो बराच उत्सुक असल्याचंही म्हटलं जात आहे.
Image credits: instagram
Marathi
2024मध्ये चित्रिकरणास सुरुवात होणार
सिनेमाबाबत अद्याप केवळ चर्चा सुरू आहेत. यानुसार सिनेमाच्या चित्रिकरणाची सुरुवात वर्ष 2024मध्ये होणार असल्याचे बोलले जात आहे.
Image credits: Social Media
Marathi
सीतेच्या भूमिकेत कोण दिसणार?
सिनेमामध्ये सीतेच्या भूमिकेत दाक्षिणात्य सिनेमांमधील प्रसिद्ध अभिनेत्री साई पल्लवी दिसणार असल्याची माहिती आहे.