- Home
- Entertainment
- PHOTOS : धर्मेंद्र यांनी आपला 88वा वाढदिवस सनीसोबत केला साजरा, चाहत्यांनी आणला स्पेशल केक
PHOTOS : धर्मेंद्र यांनी आपला 88वा वाढदिवस सनीसोबत केला साजरा, चाहत्यांनी आणला स्पेशल केक
- FB
- TW
- Linkdin
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद यांनी (Happy Birthday Dharmendra Ji) आपला 88वा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा केला. त्यांचा मुलगा व अभिनेता सनी देओलच्या घराबाहेर चाहतेमंडळी स्पेशल केक घेऊन पोहोचले होते. यानंतर सर्वांनी एकत्रित धर्मेंद्र यांचा वाढदिवस साजरा केला.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाची 88 वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने चाहत्यांनी त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. यावेळेस त्यांचा मुलगा व अभिनेता सनी देओल देखील हजर होता.
धर्मेंद्र यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी चाहते सनी देओलच्या घराबाहेर जमले होते.
धर्मेंद्र यांचे चाहते त्यांच्यासाठी केक घेऊन पोहोचले होते. हा केक खूप स्पेशल आणि आकाराने मोठा होता. या केकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा अतिशय सुंदर पद्धतीने लिहिण्यात आल्या होत्या.
धर्मेंद्र यांनी सर्वांसोबत मिळून वाढदिवसाचा केक कापला. या स्पेशल केकवर त्यांचे फोटो देखील आपण पाहू शकता.
धर्मेंद्र यांनी त्यांचा लाडका लेक सनी देओलला केक भरवला. सनी देओल आणि धर्मेंद्र या दोघांनीही केक खात चाहत्यांसोबत फोटो काढले. या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत.
धर्मेंद्र या वयातही सिनेमांमध्ये काम करत आहेत. यंदा बॉक्सऑफिसवर झळकलेल्या “रॉकी और रानी की प्रेम कहानी” सिनेमामध्येही त्यांनी दमदार भूमिका साकारली आहे.
आणखी वाचा :
ज्युनिअर मेहमूद यांची कॅन्सरशी झुंज अखेर संपली, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
BOX OFFICEनंतर रणबीर कपूरचा ‘Animal’ OTTवरही धुमाकूळ घालणार, जाणून घ्या DETAILS