Parineeti Chopra : फार कठीण आहे, पण मी तुमच्यासाठी काहीही करू शकते, परिणिती कोणासाठी जोखीम पत्करतेय?

| Published : Dec 07 2023, 07:57 PM IST / Updated: Dec 14 2023, 05:12 PM IST

Bollywood actress
Parineeti Chopra : फार कठीण आहे, पण मी तुमच्यासाठी काहीही करू शकते, परिणिती कोणासाठी जोखीम पत्करतेय?
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Bollywood News: परिणिती चोप्रा म्हणते, "मला माझ्या स्टुडिओची आठवण येतेय. जिममध्ये राहून अमरजोत जी यांच्याप्रमाणे गेटअप करण्याचा प्रयत्न करतेय. हे फार कठीण आहे, पण इम्तियाज सर तुमच्यासाठी मी काहीही करू शकते."

Bollywood News: अभिनेत्री परिणिती परिणिती चोप्राने नुकत्याच आपल्या चाहत्यांसह फॉलोअर्ससाठी जिममधील वर्कआऊट करताना एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखाली एक स्पेशल मेसेजही तिने लिहिला आहे. यामध्ये परिणितीने इम्तियाज अली यांचा आगामी सिनेमा ‘चमकीला’ (Imtiaz Ali's film Chamkila)मधील आपल्या भूमिकेबद्दल सांगितले आहे. 

परिणितीने शेअर केला व्हिडीओ
परिणितीने एक व्हिडीओ शेअर करत तिचा आगामी सिनेमा 'चमकीला'मधील आपल्या भूमिकेबद्दल सांगितले आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी 15 किलो वजन वाढवतेय हे देखील तिने म्हटले. चमकीला सिनेमात परिणिती दिवगंत पंजाबी फोक गायक अमरजोत कौर यांची भुमिका साकारत आहे.

व्हिडीओ शेअर करण्यासोबत परिणितीने त्याखाली एक मेसेज देखील लिहिला आहे. त्यात तिने म्हटले आहे, मी या वर्षात रहमान सरांच्या स्टुडिओमध्ये सहा महिने गाण्याचा सराव केला. तसेच 'चमकीला'मधील माझ्या भूमिकेसाठी 15 किलो वजन वाढवण्यासाठी प्रयत्नही केला. गेल्या काही दिवसांपासून केवळ खाण्यात आणि संगीतामध्येच आमचा वेळ व्यतीत केला जात आहे. सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले असल्याने अभिनेत्री परिणितीची खऱ्या आयुष्यातील कहाणी आता पूर्णपणे वेगळी आहे

परिणितीने हे देखील म्हटले, “मला स्टुडिओची आठवण येतेय. जिममध्ये राहून अमरजोत जी यांच्याप्रमाणे गेटअप करण्याचा पूर्ण प्रयत्न करतेय. हे फार कठीण आहे. पण इम्तियाज सर तुमच्यासाठी काहीही करू शकते.”

View post on Instagram
 

इम्तियाज अली यांचा आगामी सिनेमा
यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला, इम्तियाज अली यांनी  सिनेमाचा एक टीझर लाँच करत सिनेमाची घोषणा केली होती. अली हे दिवंगत गायक अमर सिंह चमकीला यांच्या बायोपिक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहेत.

अमर सिंह 1988 यांची वयाच्या 27व्या वर्षी हत्या करण्यात आली होती. अमर सिंह चमकीला त्यावेळी पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. दिलजित दोसांझ या सिनेमात मुख्य भूमिका साकारणार आहे. तर परिणिती पंजाबी फोक गायक अमरजोत कौर यांची भूमिका साकारणार आहे.

याशिवाय चमकीला सिनेमाचे दिग्दर्शन इम्तियाज अली करत आहेत. सिनेमाचे म्युझिक ए.आर. रहमान यांनी तयार केले आहे. हा सिनेमा 2024 मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. इम्तियाज अली आणि एआर रहमान यांनी याआधी ‘रॉकस्टार’, ‘हायवे’, ‘तमाशा’ सारख्या सिनेमात एकत्रित काम केले आहे.

आणखी वाचा: 

BOX OFFICEनंतर रणबीर कपूरचा ‘Animal’ OTTवरही धुमाकूळ घालणार, जाणून घ्या DETAILS

Nana Patekar : चाहत्याला मारल्याचा VIDEO VIRAL, नाना पाटेकरांनी हात जोडून मागितली माफी; म्हणाले…

शाहरुख, दीपिकाचे ड्रेसिंग स्टाइल ठरवणारी ती आहे तरी कोण?