सार

पान मसाला ब्रँड विमलची (Vimal Ads News) जाहिरात केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर त्याने एप्रिल 2022मध्ये चाहत्यांची माफीही मागितली. आता खिलाडी कुमारने या जाहिरातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

Bollywood News :  विमल ब्रँडच्या जाहिरातींमध्ये अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan), अजय देवगणसोबत (Ajay Devgan) आता खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) दिसणार नाही. कारण सुपरस्टार अक्षय कुमारचा या ब्रँडसोबतचा करार संपुष्टात आला आहे. अक्षयने संबंधित करार पुढे न वाढवण्याचाही निर्णय घेतला आहे.

पान मसाला विमल ब्रँडची जाहिरात केल्याने अक्षय कुमारवर (Akshay Kumar News) खूप टीका करण्यात आली होती. शिवाय त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील करण्यात आले होते. यानंतर अक्षय कुमारने (Akshay Kumar) वर्ष 2022 मध्ये चाहत्यांसह सर्वसामान्यांचीही माफी मागितली. आता अक्षयचा कंपनीसोबतचा करार संपला आहे. त्यामुळे आता या ब्रँडच्या जाहिरातीत खिलाडी दिसणार नाही. 

अक्षयवर जोरदार झाली होती टीका

शाहरुख खान आणि अजय देवगणसोबत अक्षय कुमारही (Akshay Kumar News In Marathi) विमलच्या जाहिरातीत झळकला होता. पान मसाला ब्रँड विमलची जाहिरात केल्याने त्याला तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. यानंतर अक्षयने कंपनीसोबतचा आपला करार पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला होता.  

अक्षय कुमारने मागितली होती माफी

एप्रिल 2022मध्ये अक्षयचा सहभाग असलेली विमलची जाहिरात प्रसारित झाल्यानंतर चाहत्यांसह सर्वसामान्यांनीही खिलाडीवर मोठ्या प्रमाणात टीका केली. यानंतर त्याने सर्वांची माफी मागितली होती. यासंदर्भात अक्षयने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहित म्हटले की, “मला खंत आहे, मी तुम्हा सर्वांची, चाहत्यांची आणि फॉलोअर्सची माफी मागू इच्छितो. गेल्या काही दिवसांत तुमच्याकडून येणाऱ्या प्रतिक्रियांमुळे माझ्यावर खूप खोलवर परिणाम झाला आहे. आता मी तंबाखूजन्य प्रोडक्टचे समर्थन करणार नाही. तुमच्या भावनांचा मी आदर करतो.

मी ही जाहिरात सोडली आहे. याद्वारे मिळालेली रक्कम मी सामाजिक कार्यासाठी वापरायचे ठरवले आहे. कराराच्या कालावधीपर्यंत ब्रँड संबंधित जाहिरात दाखवू शकतात. जे माझ्या नियंत्रणात नाही, पण यापुढे मी अतिशय सतर्क राहण्याचे वचन देतो. त्या बदल्यात मला तुमचे प्रेम आणि शुभेच्छा कायम हव्या आहेत."

आताच्या समोर आलेल्या माहितीनुसार अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांना दिलेला शब्द पूर्णपणे पाळल्याचे दिसत आहे. 

आणखी वाचा

India vs AUS : शाहरुख खानने आशा भोसलेंचा वापरलेला कप उचलला, सोशल मीडियावर होतोय कौतुकाचा वर्षाव

Nana Patekar : चाहत्याला मारल्याचा VIDEO VIRAL, नाना पाटेकरांनी हात जोडून मागितली माफी; म्हणाले…

शाहरुख, दीपिकाचे ड्रेसिंग स्टाइल ठरवणारी ती आहे तरी कोण?