Bigg Boss OTT 3 : प्रीमियरची तारीख अखेर ठरली... या दिवशी प्रदर्शित होणार शो, सलमान नव्हे हा स्टार करणार सूत्रसंचालन

| Published : May 23 2024, 10:36 AM IST

first promo of bigg boss ott 3

सार

Bigg Boss OTT 3 शो संदर्भात एक धमाकेदार बातमी समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, शो ची तारीख निर्मात्यांनी कंम्फर्म केली आहे. खरंतर, जूम महिन्यात शो प्रदर्शित होणार आहे.

Bigg Boss OTT 3 : टेलिव्हिजवरील प्रसिद्ध शो बिग बॉस ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा धमाका करण्यासाठी तयार आहे. बिग बॉस ओटीटी 3 संदर्भातील घोषणा करण्यात आलीय तेव्हापासून शो प्रदर्शित होण्याची आवर्जुन वाट पाहिली जात आहे. अशातच Jio Cinema कडून आगामी सीझनची घोषणा एका टीझरच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या टीझरमध्ये बिग बॉसमधील आधीच्या सीझनच्या काही झलक दिसून येत आहेत. याशिवाय नवा सीझन कधी सुरू होणार याची देखील झलक दिसते..

जिओ सिनेमाकडून सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर बिग बॉस ओटीटी-3 च्या प्रीमियरची तारीख सांगितली आहे. शो च्या आधीच्या सीझनचे काही क्लिप शेअर करत निर्मात्यांनी लिहिले आहे की, बिस बॉस ओटीटीचा नवा सीझन पाहून सर्वकाही विसराल. #BiggBossOTT3 येत्या जूनला JioCinema प्रीमियरवर येत आहे. दरम्यान, तारखेची घोषणा करण्यात आलेली नाही. पण अशी अपेक्षा केली जातेय की, शो चा प्रीमियर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात असणार आहे.

अनिल कपूर करणार सूत्रसंचालन?
शो च्या शेड्यूलच्या कारणास्तव येणाऱ्या समस्यांमुळे सलमान खान बिग बॉस ओटीटी-3 चे सूत्रसंचालन करणार नाही अशी बातमी आली होती. अफवा होती की, करण जौहर, संजय दत्त किंवा अनिल कपूर शो चे सूत्रसंचालन करू शकतात. पण प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर वाटतेय की, अनिल कपूर शो चे सूत्रसंचालन करू शकतात.

सब्सक्रिप्शन घेऊन पाहवा लागणार शो
बिग बॉस ओटीटी-3 यंदा फुकटात पाहायला मिळणार नाहीये. यंदा शो पाहण्यासाठी जिओ सिनेमाचे सब्सक्रिप्शन घ्यावे लागणार आहे. याची किंमत 29 रुपये आहे. शो मधील स्पर्धकांबद्दल बोलायचे झाल्यास अशी चर्चा आहे की, मॅक्सटर्न आणि ठगेश, विक्की जैन, पारस कलनावत, शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुशे शो मध्ये सहभागी होऊ शकतात. याशिवाय टेलिव्हिजनवरील शो 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील नायराची भूमिका साकारणारी शिवांगी जोशीही शो मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

या अभिनेत्रींचे खुलले OTT मुळे नशीब, ही अभिनेत्री पहिल्या क्रमांकावर

3 खान आणि हे कपल्स, अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग गेस्ट लिस्टमध्ये कोणा-कोणाचा समावेश? वाचा सविस्तर