3 खान आणि हे कपल्स, अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग गेस्ट लिस्टमध्ये कोणा-कोणाचा समावेश? वाचा सविस्तर

| Published : May 22 2024, 08:08 AM IST / Updated: May 22 2024, 08:14 AM IST

Anant And Radhika

सार

Anant-Radhika 2nd Pre-Wedding : शाहरुख खान, सलमान आणि आमिर खानसह काही दिग्गज कलाकार अनंत अंबानीच्या दुसऱ्या प्री-वेडिंगला हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय अन्य काही कलाकारांच्या प्री-वेडिंगची गेस्ट लिस्टवर आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Anant-Radhika 2nd Pre-Wedding Guest : जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि वीरेन मर्चेंट यांची मुलगी राधिका मर्चेंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू झाली आहे. तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यावेळी दोन्ही परिवाराव्यतिरिक्त सिनेसृष्टीतील काही दिग्गज कलाकार उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान उपस्थितीत राहणार असल्याचे बोलले जात आहे.

अनंत आणि राधिकाचे दुसरे ग्रँड प्री-वेडिंग सेलिब्रेशन
अनंत आणि राधिकाचे दुसरे ग्रँड प्री-वेडिंग सेलिब्रेशन लवकरच होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, एका आलिशान क्रुजवर सेलिब्रेशन 28 मे ते 30 मे पर्यंत असणार आहे. क्रुजवर 800 पाहुणे उपस्थिती लावणार असून क्रुज इटली (Italy) येथून दक्षिण फ्रान्सचा (South France) प्रवास करणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनवेळी सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान येण्याची शक्यता आहे. याशिवाय रणबीर कपूर, आलिया भट्टसह काही सेलिब्रेटी उपस्थिती लावू शकतात. क्रुजवर पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी 600 स्टाफ असणार आहे. सेलिब्रेशनवेळी क्रुज 4380 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. दरम्यान, सेलिब्रेशनच्या गेस्ट लिस्ट किंवा अन्य काही गोष्टींबद्दल अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जामनगरमध्ये सेलिब्रेटींची उपस्थिती
अनंत आणि राधिकाचे पहिले प्री-वेडिंगवेळी गुजरातमधील (Gujrat) जामनगर येथे पार पडले होते. या सेलिब्रेशनसाठी जगभरातील काही व्हिआयपी (VIP) आणि सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थिती लावली होती. जामनगरमध्येही शाहरुख खान, सलमान आणि आमिर खान यांची जोडी दिसली होती. याशिवाय काही दिग्गज कलकारांनीही उपस्थिती लावली होती. प्री-वेडिंगचे खास आकर्षण आंतरराष्ट्रीय गायिका रिहाना होती. रिहानाने प्री-वेडिंगवेळी आपल्या धमाकेदार परफॉर्मेन्सने सर्वांची मनं जिंकली होती.

या स्टारचीही उपस्थिती
पहिल्या प्री-वेडिंगवेळी जान्हवी कपूर, अर्जुन कपूर, सुहाना खान, करिना कपूर, करिश्मा कपूर, राणी मुखर्जी, नताशा पूनावाला, रितेश आणि जेनेलिया देशमुख, रणवीर आणि दीपिका पादुकोण, कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्ट-रणबीर कपूरसह काही कलाकारांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय रजनीकांत, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चननेही उपस्थिती लावली होती.

आणखी वाचा :

या दिवसापासून सुरु होणार अनंत - राधिकाच्या लग्नाचा शाही सोहळा

प्रभास नव्हे या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधणार अनुष्का शेट्टी, अभिनेत्रीच्या विवाहाच्या चर्चांना उधाण