'भविष्यात सिंगल मदर झाल्यास आनंद होईल', अभिनेत्रीने Eggs फ्रीज करत म्हटले...

| Published : May 29 2024, 12:17 PM IST / Updated: May 29 2024, 12:21 PM IST

Akansha Puri

सार

Entertainment : बिग बॉस ओटीटी2 फेम आकांक्षा पुरी सोशल मीडियावरील सर्वाधिक प्रसिद्ध सेलिब्रेटींपैकी आहे. अशातच अभिनेत्रीने एग फ्रिजिंग सर्जरी केल्याची बातमी समोर आली आहे.

Entertainment : आकांक्षा पुरी टेलिव्हिजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आकांक्षा टीव्हीवरील शो ‘विघ्नहर्ता गणेश’ मध्ये पार्वतीची भूमिका साकारत आहे. बिग बॉस ओटीटी 2 मुळे आकांक्षा पुरी लाइमलाइटमध्ये आली आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर आपल्या कामासह खासगी आयुष्यातील काही फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने एग्ज फ्रीज केले आहेत.

अभिनेत्रीचे रिलेशनशिप
रिअ‍ॅलिटी शो बिग बॉस-13 मध्ये आपला एक्स बॉयफ्रेंड पारस छाबडा आल्यानंतर आकांक्षा पुरीला अधिक प्रसिद्ध मिळाली. अशातच अभिनेत्रीने नात्यावर उघडपणे भाष्य केले. या दोघांचे ब्रेकअपचे कारण ठरले म्हणजे पारसच्या वाईट कमेंट्स. यानंतर युजर्सने आकांक्षाला 'मीका दी वोटी' शो मध्ये पाहिले. यामध्ये अभिनेत्रीने वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली होती. आकांक्षा आणि मीका अनेक वर्षांपासून मित्र आहेत. अशातच 'मीका दी वोटी' शो अभिनेत्रीने मीकासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याचा निर्णय घेतला, पण नंतर आकांक्षाने मीका आणि मी मित्रच राहणार आहोत असे जाहीर केले.

आकांक्षाने फ्रिज केले एग्ज
आकांक्षा पुरीने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक नोट शेअर केली आहे. यामध्ये अभिनेत्रीने म्हटले की, आई होण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे. खरंतर, अभिनेत्रीने एग्ज फ्रीज करण्याचा निर्णय घेतला आहे. याच्या शस्रक्रियेदरम्यान झालेल्या वेदनांबद्दलही अभिनेत्रीने भाष्य केले आहे. याशिवाय अद्याप आणखी काही शस्रक्रिया होणार असल्याचे आकांक्षाने म्हटले आहे.

अभिनेत्रीने पुढे म्हटले की, "मी सुंदर काळाचा आनंद घेत आहे. मला अत्याधिक आनंद होतोय सर्वकाही मी करत आहे. सर्व तरुणींना माझा मेसेज आहे, तुम्ही जेवढा विचार करता त्यापेक्षाही अधिक मजबूत आहात"

मुलाखतीत काय म्हणालीय आकांक्षा
आकांक्षाने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “आयुष्यात एकटे राहायचे नाहीये. भविष्यात बाळ हवयं. यामुळेच गेल्या चार वर्षांपासून एग्ज फ्रीज करण्याचा विचार करत होती. जर एग्ज फ्रीजची प्रक्रिया आधीच करायला हवी होती. भविष्यात जर सिंगल मदर झाल्यास अत्यंत आनंद होईल. आधीच्या रिलेशनशिपमधून बाहेर पडल्यानंतर सर्वप्रथम भविष्य सुरक्षित करण्याचा विचार केला. या निर्णयाला आईने पाठिंबा दिल्याचेही आकांक्षाने म्हटले. खरंतर, एग्ज फ्रीज करण्याची प्रक्रिया सोप्पी नसल्याचेही अभिनेत्रीने म्हटले आहे.”

या अभिनेत्रींनीही केलेय एग्ज फ्रीज
आकांक्षा पुरीच नव्हे टीव्ही ते बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी आपले एग्ज फ्रीज केले आहेत. यामध्ये राखी सावंत, रिद्धिमा पंडित, मोना सिंह, तनीषा मुखर्जीसारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

आणखी वाचा : 

16 वर्षीय तरुणीशी लग्न...घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्रीवर जडले प्रेम, एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी आहे अभिनेत्याची लव्ह स्टोरी

Panchayat Season 4 संदर्भात निर्मात्यांची मोठी घोषणा, प्रेक्षकांना एवढ्या भागापर्यंत घेता येणार मनोरंजनाची मजा