सार
Pankaj Kapur Birthday : 29 मे 1954 रोजी पंजाबमधील लुधियानामध्ये जन्मलेले अभिनेते पंजक कपूर यांचे सिनेसृष्टीत फार महत्त्वाचे योगदान राहिलेले आहे. पण पंकज कपूर यांच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टींबद्दल फार कमी जणानांचा माहितेय.
Pankaj Kapur Birthday : हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक असणाऱ्या पंकज कपूर यांचा आज वाढदिवस आहे. पंकज यांनी अभिनयच नव्हे तर दिग्दर्शनातही आपली जादू चालवली आहे. त्यांचा मुलगा शाहिद कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यापैकी एक आहे. पंकज कपूर यांनी सिनेसृष्टीत आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. खरंतर, पंकज कपूर यांच्या प्रोफेशनल लाइफबद्दल सर्वांना माहितेय. पण खासगी आयुष्याच्या काही गोष्टी फार जणांना माहिती नाही. अशातच पंकज कपूर यांच्या वाढदिवसानित्त त्यांच्या आयुष्यातील काही खास गोष्टींबद्दल जाणून घेऊया...
कुठे जन्म झालाय?
29 मे 1954 रोजी पंजाबमधील लुधियाना येथे पंकज कपूर यांचा जन्म झाला आहे. पंकज यांचे वडिल प्राध्यापक होते. अवघ्या लहान वयापासूनच पंकज यांनी अभिनयाला आत्मसात केले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयात करियर करण्याचे ठरवले. यानंतर पंकज यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. याशिवाय एफटीआयमध्ये प्रवेश न मिळाल्याने पंकज यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेतले.
16 वर्षीय तरुणीसोबत विवाह
पंकज कपूर यांनी अभिनेत्री निलिमा अजीम यांच्यासोबत लग्न केले होते. नाटकादरम्यान, पंकज कपूर यांची भेट नीलिमा यांच्यासोबत झाली होती. नीलिमा उत्तम नृत्यांगना होत्या आणि यामध्येच त्यांना करियर करायचे होते. दोघांचे कालांतराने रिलेशनिप सुरू झाले. 16 व्या वर्षी नीलिमासोबत पंकज यांनी 21व्या वयात लग्न केले. लग्नानंतर वर्ष 1976 मध्ये पंकज कपूर मुंबईत करियर करण्यासाठी आले. वर्ष 1981 मध्ये पंकज आणि नीलिमा यांनी शाहिद कपूरला जन्म दिला. इंडस्ट्रीमध्ये आपले करियर करण्यामागे लागलेले पंकज कपूर आणि नीलिमा यांच्या वैवाहिक आयुष्यात काळानुसार वाद होऊ लागले. अशातच वर्ष 1984 मध्ये दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
सुप्रिया पाठक यांच्यासोबत दुसरे लग्न
पंकज कपूर यांचे आयुष्य एखाद्या सिनेमातील कथेप्रमाणे आहे. पहिले लग्न मोडल्यानंतर पंकज यांच्या आयुष्यात अभिनेत्री सुप्रिया पाठकची एण्ट्री झाली. सुप्रिया आणि पंकज यांची पहिली भेट 'नया मौसम' सिनेमाच्या सेटवर झाली होती. सुप्रिया यांचा देखील घटस्फोट झाला होता. अशातच दोघांचे नाते सुरू झाले आणि काही काळानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर सासूने केले स्विकार
पंकज कपूर यांच्या परिवाराला त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल काहीच समस्या नव्हती. पण सुप्रिया यांची आई पंकज यांच्यासोबत मुलगीच्या लग्नासाठी तयार नव्हती. अशातच आईच्या विरोधात जाऊन सुप्रिया पाठक यांनी पंकज कपूर यांच्यासोबत विवाह केला. सुप्रिया आणि पंकज यांना दोन मुलं आहेत. इशान खट्टर आणि सना अशी दोन्ही मुलांची नावे आहेत. सुप्रिया आणि पंकज या दोघांना लग्नानंतर सासूने आपलेसे केले.
पंकज कपूर यांचे सिनेमे
पंकज कपूर यांनी टेलिव्हिजन शो ‘नीम का पेड़’, ‘करमचंद’ आणि ‘ऑफिस ऑफिस’ साठी काम केले. याशिवाय 'दो यारों','मकबूल', 'हल्ला बोल', 'आघात', 'रोज़ा', 'मंडी', 'गांधी' सिनेमांसह काही दमदार सिनेमांमध्ये काम केले आहे.
आणखी वाचा :
Amazon Prime च्या माध्यमातून सिनेमा Rent वर कसा घ्यायचा? जाणून घ्या शुल्कासह महत्त्वाची माहिती
कोट्यावधींचे मालक आहेत TMKOC चे जेठालाल, एक दिवासाची कमाई ऐकून व्हाल हैराण