T-Series चे मालक भूषण कुमार यांच्या 21 वर्षीय चुलत बहिणीचे कॅन्सरने निधन

| Published : Jul 19 2024, 02:21 PM IST / Updated: Jul 19 2024, 02:34 PM IST

bhushan kumar niece tishaa kumar dies

सार

Actor Krishan Kumar Daughter Tishaa Passed Away : टी-सीरिजचे मालक यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भूषण कुमार यांची चुलत बहीण तिशाचे कॅन्सरने निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तिशा केवळ 21 वर्षांची होती.

Actor Krishan Kumar Daughter Tishaa Passed Away :  टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांची चुलत बहिण आणि अभिनेते कृष्णा कुमार यांची मुलगी तिशा कुमारचे निधन झाले आहे. दीर्घकाळापासून तिशा कॅन्सर आजाराशी झुंज देत होती. अखेर तिशाचे वयाच्या 21 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार, तिशावर आधी मुंबईत उपचार सुरु होते. यानंतर उपचारासाठी तिशाला जर्मनीत हलवण्यात आले. जर्मनीतील रुग्णालयात भरती केल्यानंतर तिशाचे गुरुवारी (18 जुलै) निधन झाले.

टी-सीरिजच्या प्रवक्त्यांनी एक स्टेटमेंट जारी करत म्हटले की, "कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमारचे प्रदीर्घकाळाच्या आजाराच्या लढाईची झुंज अखेर संपली आहे. परिवारासाठी अत्यंत कठीण वेळ आहे. आम्ही सर्वांना विनंती करतो की, परिवाराच्या प्रायव्हेसीचा आदर करावा."

अभिनेते कृष्णा कुमार यांची लेक
कृष्णा कुमार यांची मुलगी तिशा कुमारचे कॅन्सरच्या आजाराने निधन झाले आहे. कृष्ण कुमार यांनी 90 च्या दशकातील काही सिनेमांध्ये काम केले होते. दरम्यान, बॉलिवूडमधील काही सिनेमांमध्ये मुख्य भूमिकाही कृष्ण कुमार यांनी साकारली होती पण ओखळ मिळाली नाही. याशिवाय कृष्ण कुमार यांनी एकही हिट सिनेमा दिलेला नाही. वर्ष 1995 मध्ये कृष्ण कुमार यांचा आलेला सिनेमा ‘वेवफा सनम’ मधील ‘सिला दिया तूने मेरे प्यार...’ गाणे हिट ठरले होते. कृष्णा टी-सीरिज कंपनीचे संस्थापक गुलशन कुमार यांचे लहान भाऊ आहेत. गुलशन यांनी आपल्या भावासाठी काही सिनेमांची निर्मितीही केली होती.

टी-सीरिजचे मालकही आहेत कृष्ण कुमार
कृष्ण कुमार यांचा जन्म पंजाबी घराण्यातील आहे. त्यांचे वडील चंद्रभान फळ विक्रेते होते, जे फाळणीनंतर दिल्लीत आले होते. कृष्णा कुमार कॅसेट्स इंडस्ट्रीजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे लहान भाऊ आहेत. या दोघांच्या कंपनीला टी-सीरिज नावाने ओखळले जाते. कृष्णा कुमार यांनी अभिनेत्री तान्या सिंहसोबत विवाह केला होता. जी संगीतकार अजित सिंह यांची मुलगी आहे. अभिनयात यश न मिळाल्याने कृष्णा कुमार यांनी टी-सीरिजची सूत्रे सांभाळण्यास सुरुवात केली. आता भाचा भूषण कुमारसोबत कृष्णा कुमार टी-सीरिजचे कामकाज पाहतात. टी-सीरिजद्वारे प्रोड्यूस करण्यात आलेल्या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. टी-सीरिज प्रोडक्शनअंतर्गत आगामी सिनेमांबद्दल बोलायचे झाल्यास त्यामध्ये 'भुल भूलैय्या-3', 'रेड-2', 'मेट्रो इन दिनो' अशा सिनेमांचा समावेश आहे.

आणखी वाचा : 

'VIOLENT VALENTINE’S DAY' म्हणत शाहीदने Deva सिनेमाच्या रिलीजची डेट केली जाहीर

Explained : Hardik Pandya आणि Natasa Stankovic यांच्यामध्ये घटस्फोट का झाला?