सार

बॉलिवूडमधील अभिनेता शाहीद कपूरचा आगामी सिनेमा देवाची रिलीज डेट अखेर ठरली आहे. यासंदर्भात शाहीदने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये शाहिदचा रौद्र रुप पाहून अंदाज लावला जाऊ शकतो त्याची सिनेमातील भूमिका काय असेल. 

Shahid Kapoor Deva Movie Release Date : शाहीद कपूर बॉलिवूडमधील सर्वाधिक टॅलेंटेड अभिनेत्यांपैकी एक आहे. शाहिदने वर्ष 2003 मध्ये रोमँटिक कॉमेडी सिनेमा इश्क-विश्क मधून आपल्या अभिनयाच्या करियरला सुरुवात केली होती. यानंतर अभिनेत्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. शाहीद कपूरचा ‘जब वी मेट’, ‘हैदर’ आणि ‘उडता पंजाब’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता शाहीदचा आगामी सिनेमा देवा कधी रिलीज होणार याची घोषणा अभिनेत्याने केली आहे.

शाहीद कपूरचा ‘कबीर सिंह’ सिनेमालाही प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाह मिळाला. याशिवाय शाहिदने ओटीटी प्लॅटफॉर्मवरील ‘फर्जी’ (Farzi)आणि ‘ब्लडी डॅडी’ (Bloody Daddy) मधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता शाहीदचा आगामी सिनेमा ‘देवा’ प्रदर्शित होण्यास तयार आहे.

शाहीद कपूरची इंस्टाग्राम पोस्ट
शाहीद कपूरने इंस्टाग्रामवर त्याचा आगामी सिनेमा देवाच्या रिलीजची डेट जाहीर केली आहे. पोस्ट शेअर करत शाहीदने कॅप्शनमध्ये “VIOLENT VALENTINE’S DAY म्हणत येत्या 14 फेब्रुवारी, 2025 रोजी सिनेमा तुमच्या भेटीला येणार” असल्याचे म्हटले आहे. या सिनेमातील शाहीदचा किलर लूक पोस्टरमध्ये दिसून येत आहे. अभिनेत्याची पोलिसाची भूमिका धमाकेदार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय पोस्टखाली चाहत्यांकडून शाहीदला आगामी सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

View post on Instagram
 

सिनेमातील स्टारकास्ट
शाहीद कपूरचा आगामी सिनेमा देवामध्ये पूजा हेगडे झळकणार आहे. पहिल्यांदाच शाहीद पूजा हेगडेसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. देवा सिनेमाचे दिग्दर्शन रोशन अँड्र्युज यांनी केले असून झी स्टुडिओ आणि रॉय कपूर फिल्म्सने निर्मिती केली आहे.

दरम्यान, शाहीदचा देवा सिनेमाची याआधी रिलीज डेट दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ठरवण्यात आली होती. गेल्या वर्षातच सिनेमा 11 ऑक्टोंबर, 2023 रोजी प्रदर्शित होईल अशी पोस्टही शाहीदने इंस्टाग्रामवर शेअर केली होती. पण आता नवी रिलीज डेट जाहीर केल्यानंतर शाहीदच्या चाहत्यांना त्याच्या आगामी सिनेमासाठी उत्सुकता अधिक वाढली आहे. 

आणखी वाचा :

Explained : Hardik Pandya आणि Natasa Stankovic यांच्यामध्ये घटस्फोट का झाला?

रिचा चड्ढा-अली फजलच्या घरी गोड चिमुकलीचे आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव