कधीकाळी कचरा डब्यातील अन्नपदार्थ खायची, आज एका एपिसोडसाठी वसूल करते लाखो रुपये

| Published : Sep 04 2024, 01:01 PM IST

Bharti Singh
कधीकाळी कचरा डब्यातील अन्नपदार्थ खायची, आज एका एपिसोडसाठी वसूल करते लाखो रुपये
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

Bharati Singh Life Story : भारती सिंहचे आयुष्य संघर्षात्मक राहिले आहे. यामुळे भारतीने गरीबी अत्यंत जवळून पाहिली आहे. वडीलांचे निधन झाले त्यावेळी भारती अवघ्या 2 वर्षांची होती. एका मुलाखतीत भारतीने कचऱ्यातील पदार्थ खायची असा खुलासा केला होता.

Bharati Singh Life Story : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आयुष्यात संघर्ष करुन यश मिळवले आहे. गरीबी जवळून पाहिलेल्या कलाकारांमध्ये जॅकी श्रॉफ असो किंवा बोमन इराणी यांच्या आयुष्याच्या प्रेरणादायी कथांमधून शिकण्यासारखे आहे. अशातच टेलिव्हजनवर हास्याची राणी म्हणून आज गाजत असलेली भारती सिंहचे आयुष्यही संघर्षात्मक राहिले होते. एका टीव्ही शो मुळे भारती सिंहचे संपूर्ण आयुष्य बदललेच. पण एक नवी ओखळही मिळाली.

या कारणास्तव कचरा डब्यातील पदार्थ खायची
अवघ्या वयाच्या दुसऱ्या वर्षी भारती सिंहच्या वडिलांचे निधन झाले. वडीलांच्या मृत्यूनंतर भारतीला खुप संघर्ष करावा लागला होता. यादरम्यान, भारतीची आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम तर भाऊ कारखान्यात काम करायचा. भारतीच्या घरी खाण्यापिण्यासाठीही पुरेशे अन्न नसायचे. यामुळे शिळे अन्नपदार्थ खाया लागायचे. एवढेच नव्हे काहीवेळेस कचरा डब्यात फेकलेले पदार्थही भारतीने खाल्ले आहे. भारतीने म्हटले होते की, लोक अर्धवट सफरचंद खाऊन टाकून देतात. यामुळे पाप लागते असे मला वाटायचे. यामुळे कचऱ्यात टाकलेले सफरचंदही मी खाल्ले आहे.

भारती सिंहचे पालटले नशीब
भारती सिंहचे नशीब अशावेळी पटलटले जेव्हा सुदेश लहरी यांनी तिला एका कॉमेडी शो साठी ऑडिशन देण्यासाठी प्रोत्साहित केले. यासाठी भारतीची निवड करण्यात आली. कॉमेडी शो साठी भारती आईसोबत मुंबईत आली. यानंतर भारतीने आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही. आज भारती कॉमेडीची क्विन म्हणून ओळखली जाते.

भारती सिंहने 'कॉमेडी सर्कस के महाबली', 'कॉमेडी नाइट्स बचाओ', 'द कपिल शर्मा' सारख्या कॉमेडी शो मध्ये काम केले. याशिवाय 'इंडियाज गॉट टॅलेंट 7' , 'इंडियाज बेस्ट डान्सर', 'डान्स दीवाने' सारख्या शो मध्येही भारतीने काम केले आहे. अखेर भारतीला रिअ‍ॅलिटी शो 'लाफ्टर शेफ्स' मध्ये सूत्रसंचालन करताना पाहिले. याच्या एका एपिसोडसाठी भारती 10-12 लाख रुपये फी चार्ज करत आहे. अशातच भारती सिंह सर्वाधिक कमाई करणारी कॉमेडियन ठरली आहे.

आणखी वाचा : 

Teachers Day 2024 : शिक्षणावर आधारित मराठीतील 5 सिनेमे, लावतील आयुष्याला कलाटणी

The Buckingham Murders ओटीटीवर कधी आणि कुठे होणार रिलीज?