Teachers Day 2024 : शिक्षणावर आधारित मराठीतील 5 सिनेमे, लावतील आयुष्याला कलाटणी
- FB
- TW
- Linkdin
)
शिक्षक दिन 2024
देशात प्रत्येक वर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा होतो. अशातच शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर आधारित असे काही मराठी सिनेमे तुम्ही यंदाच्या शिक्षक दिनानिमित्त पाहू शकता.
गुरुकुल
रोमेल रॉड्रिग्सचे पहिले दिग्दर्शन असलेला 'गुरुकुल' सध्याच्या शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी ती कशी सुधारली जाऊ शकते यावर आधारित आहे. सिनेमात मुख्य भूमिकेत नागेश भोसले, विद्याधर जोशी, प्रदीप कुमार, प्रशांत मोहिते, सोनाली शेवाळे आणि नेहा खान आहेत.
नाइट स्कूल
मानसिंग पवार यांचा ‘नाइट स्कूल’ सिनेमा शिक्षणाचे महत्व काय यावर प्रकाश टाकणारा आहे. सिनेमात संदी कुलकर्णी, प्रसाद पंडित, श्रीकांत यादव, दीपा चाफेकर आणि अन्वय बेंद्रे मुख्य भूमिकेत आहेत.
निशाणी डावा अंगठा
पुरुषोत्तम बेर्डे यांचा 'निशाणी डावा अंगठा' सिनेमा रमेश इंगळे उत्राडकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे. या सिनेमाची कथा महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील 100 टक्के साक्षरता मिळवण्यासाठी राबवलेल्या शासनाच्या साक्षरता मोहिमेवर आधारित आहे. सिनेमात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिी सावंत आणि मोहन आगाशे मुख्य भूमिकेत आहेत.
10 वी फ
राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेला ‘10 वी फ’ सिनेमा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसोबत केल्या जाणाऱ्या भेदभावाबद्दल भाष्य करणारा आहे. या सिनेमात अतुल कुलकर्णी, ज्योती सुभाष, मिलिंद गुणाशी, निमिष कठाळे आणि वृषासेन दाभोळकर मुख्य भूमिकेत झळकले आहेत.
आणखी वाचा :
The Buckingham Murders ओटीटीवर कधी आणि कुठे होणार रिलीज?
अखेर ठरलं! सलमान खानच करणार Bigg Boss 18 चे सूत्रसंचालन, या दिवशी होणार प्रीमियर