सार

The Buckingham Murders OTT Release Updates : करीना कपूर स्टारर द बकिंघम मर्डर्स सिनेमागृहांमध्ये लवकरच रिलीज होणार आहे. अशातच सिनेमा ओटीवर कधी आणि कुठे रिलीज होणार याबद्दलचे अपडेट्स समोर आले आहेत.

The Buckingham Murders OTT Release : करीना कपूरचा आगामी सिनेमा द बकिंघम मर्डर्स मोठ्या पडद्यावर लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच निर्मात्यांनी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिक वाढली गेली आहे. येत्या 13 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. अशातच सिनेमा ओटीटीवर कधी आणि कुठे पाहता येणार याबद्दलचे अपडेट समोर आले आहे.

द बकिंघम मडर्स कुठे आणि कधी पाहता येणार?
सस्पेंस ड्रामा द बकिंघम मडर्समध्ये करीना कपूर गुप्तहेरच्या भूमिकेत दिसून येणार आहे. हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमाचे ओटीटी राइट्स आधीच एका मोठ्या स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्मने घेतले आहेत. सिनेमाचे ओटीची राइट्स नेटफ्लिक्सकडे आहेत. दरम्यान, सिनेमा ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार याबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. खास गोष्ट अशी की, सिनेमाचा प्रीमियर काही फिल्म फेस्टिव्हलमध्ये करण्यात आला आहे.

View post on Instagram
 

द बकिंघम मडर्स सिनेमाची स्टोरी
द बकिंघम मडर्स सिनेमात करीना कपूर जसमीत भामराच्या भूमिकेत झळकणार आहे. सिनेमात करीनाने एक ब्रिटिश भारतीय गु्प्तहेराची भूमिका साकारली आहे. एवढेच नव्हे सिनेमात करीना आपल्या मुलाच्या हत्येचा शोध घेतानाही दिसून येणार आहे.

द बकिंघम मडर्समधील स्टारकास्ट
द बकिंघम मडर्समध्ये करीना कपूरव्यतिरिक्त शेफ ते अभिनेता झालेला रणवीर बरार आणि कीथ एलन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे.. करीना बालाजी मोशन पिक्चर्स आणि महाना फिल्मअंतर्गत एकता कपूर आणि शोभा कपूरसोबत मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे.

आणखी वाचा : 

अजय देवगणच्या Singham Again सिनेमाची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलणार?

अंकिता लोखंडेच्या आलिशान घराचे 10 फोटोज, पाहून व्हाल अव्वाक