Pushpa 2 Angaaron Song : श्रीवल्लीच्या प्रेमात पार बुडालाय अल्लू अर्जुन, सिनेमातील लेटेस्ट गाणे पाहून नक्कीच थिरकाल (Watch Video)

| Published : May 29 2024, 02:48 PM IST

Angaaron (The Couple Song) Lyrical Video
Pushpa 2 Angaaron Song : श्रीवल्लीच्या प्रेमात पार बुडालाय अल्लू अर्जुन, सिनेमातील लेटेस्ट गाणे पाहून नक्कीच थिरकाल (Watch Video)
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पुष्पा 2 सिनेमाची प्रत्येकजण आतुरनेते वाट पाहत आहे. सिनेमात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाची धमाकेदार केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. अशातच सिनेमातील 'अंगारों' लिरिकल गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे.

Angaaron (The Couple Song) Lyrical Video : ‘पुष्पा: द राइज’ सिनेमा वर्ष 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. अशातच सिनेमाचा दुसरा भाग म्हणजेच ‘पुष्पा 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी सिनेमातील अंगारों लिरिकल गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. याआधी सिनेमाता टायटल ट्रॅक लाँच करण्यात आले होते.

पुष्पा2 सिनेमातील दुसरे गाणे प्रदर्शित
गायिका श्रेया घोषालच्या आवाजातील अंगारों गाणे तुम्हाला नक्कीच थिरकण्यासाठी भाग पाडणारे आहे. या गाण्याचे बोल रकीब आलम आणि श्री देवी प्रसाद यांनी म्युझिक दिले आहे. दरम्यान, अंगारों गाण्याचा अधिकृत व्हिडीओ समोर आलेला नाही. गाणे शूट होण्याआधीचे काही बीएट्स असून त्यामध्ये रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन एकत्रित डान्स करताची झलक दाखवण्यात आली आहे. श्रीवल्लीचा अंदाज सर्वांना वेड लावणारा आहे.

YouTube video player

पुष्पा2 च्या नव्या गाण्याची इंटरनेटवर धूम
पुष्पा 2 सिनेमाचा टायटल ट्रॅक 'पुष्पा-पुष्पा' गाण्याला 2.26 दशलक्षपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. गाणे सहा भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहे. अशातच सिनेमातील दुसरे गाणेही पहिल्या गाण्याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची चर्चा सुरू झाली आहे. सिनेमातील संगीताचे अधिकार टी-सीरिजकडे आहेत.

सिनेमातील स्टार कास्ट
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा पुष्पा2 सिनेमा येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात फहद फासिल, धनंजय, जगदीश प्रताप बंडारी, राव रमेश, अजय सुनीय, अनसूया भारद्वाज, शनमुख आणि अजय घोष असे कलाकारही झळकणार आहेत. सिनेमा तेलुगु, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नडसह बंगाली भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. सिनेमाचे शूटिंग सध्या सुरूच असूच लवकरत पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू होणार आहे.

आणखी वाचा : 

16 वर्षीय तरुणीशी लग्न...घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्रीवर जडले प्रेम, एखाद्या सिनेमाच्या कथेसारखी आहे अभिनेत्याची लव्ह स्टोरी

Panchayat Season 4 संदर्भात निर्मात्यांची मोठी घोषणा, प्रेक्षकांना एवढ्या भागापर्यंत घेता येणार मनोरंजनाची मजा

Top Stories