- Home
- Entertainment
- Radhika-Anant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील वरमाला ते सप्तपदीपर्यंतच्या खास विधींसह सर्वकाही अपडेट्स घ्या जाणून
Radhika-Anant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यातील वरमाला ते सप्तपदीपर्यंतच्या खास विधींसह सर्वकाही अपडेट्स घ्या जाणून
- FB
- TW
- Linkdin
अनंत अंबानी-राधिका मर्चेंट विवाहसोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा अखेर 12 जुलैला विवाहसोहळा पार पडत आहे. कपलच्या लग्नाआधी ग्रँड फंक्शनला सुरुवात झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले. अँटिलियाला शानदार सजावट करण्यासह तेथे पार पडणाऱ्या प्रत्येक फंक्शनला बॉलिवूड कलाकारांनी उपस्थिती लावली. आज अनंत-राधिकाचा लग्नसोहळा पार पडत आहे. 12 जुलै ते 15 जुलै पर्यंत कपलचे काही फंक्शनही पार पडणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी देश-विदेशातून पाहुणे मुंबईत दाखल झाले आहेत. जाणून घेऊया अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यावेळी होणाऱ्या विधींसह अन्य काही महत्वाचे अपडेट्स....
3 वाजता सुरु झालीय बारातची तयारी
अनंत अंबानी राधिकाला आपल्या घरी घेऊन येण्यासाठी तयार आहे. यासाठी बारात तयारी अँटेलियावर दुपारी 3 वाजल्यापासूनच सुरु झाली. आता अंबानी परिवारातील सदस्य जिओ वर्ल्डच्या दिशेने जाण्यासाठी निघाले आहेत. रात्री 8 वाजता वरमाला आणि 9 वाजून 30 मिनिटांनी सप्तपदी सुरु होणार आहे. यावेळी भारतीय परंपरेनुसार ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.
14 जुलैला अनंत-राधिकाचा मंगल उत्सव
अंबानी वेडिंग कार्डनुसार 14 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा मंगल उत्सव होणार आहे. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणाऱ्या मंगल उत्सवावेळी देखील भारतीय परंपरेनुसार पाहुण्यांना ड्रेस कोड असणार आहे. यानंतर 15 जुलैला कपलचे ग्रँड रिसेप्शन असणार आहे. वेडिंग रिसेप्शन संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे.
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी परदेशातून पाहुणे मुंबईत
अनंत-राधिकाच्या लग्नसाठी देश-विदेशातून पाहुणे मुंबईत दाखल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय मॉडेल किम कार्दशियन आपल्या बहिणीसोबत मुंबईत आली आहे. याशिवाय लालू प्रसाद यादव संपूर्ण परिवारासह मुंबईत दाखल झाले आहेत. डब्लूडब्लूई स्टार जॉन सीना, ब्रिटेनते माजी पंतप्रधान बोरिस जॉनसनसह काही पाहुणे लग्नसोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत.
बॉलिवूड सेलिब्रेटींची उपस्थिती
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला मोठ्या संख्येने बॉलिवूड कलाकार उपस्थितीत राहणार आहेत. यावेळी शाहरुख खान, सलमान खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, आमिर खान, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, ऐश्वर्या राय बच्चन, सारा अली खान, जान्हवी कपूर उपस्थिती लावणार आहे.
आणखी वाचा :
नीता अंबानींची बनारसचा वारसा असणारी अनोखी साडी, जाणून घ्या खासियत
4 हजार तास वर्क केलेला इशाचा खास लेहेंगा, लिहिलाय गीतेमधील खास श्लोक