Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा शाही पद्धतीने विवाहसोहळा नुकताच मुंबईत पार पडला. यावेळी अनंतसह राधिका ब्राइडल लूकमध्ये अत्यंत सुंदर दिसत होती. पण राधिकाने लग्नासाठी चक्क बहिणीची ज्वेलरी घातल्याचे दिसून आले.
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा ग्रँड विवाहसोहळा मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 12 जुलैला पार पडला. लग्नसोहळ्यासाठी बॉलिवूड ते राजकीय क्षेत्रातील मंडळींनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले. अशातच राधिकाचा ब्राइडल लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राधिकाने लग्नासाठी परिधान केलेले लाल आणि पांढऱ्या रंगातील आउटफिट्स प्रसिद्ध डिझाइनर अबु जानी संदीप खोसला यांनी तयार केला होता. लेहेंग्यासोबत राधिकाने लेअर्ड ज्वेलरी घातली होती आणि याचीच आता सर्वाधिक चर्चा केली जात आहे.
बहिणीची ज्वेलरी
असे म्हटले जातेय की, राधिकाने लग्नसोहळ्यावेळी घातलेली ज्वेलरी बहिण अंजली मर्चेंटची होती. अंजलीने तिच्या लग्नावेळी ती ज्वेलरी घातली होती. रिपोर्ट्सनुसार, राधिकाने पोलकी कुंदन चोकरर घातला होता जो अंजलीचा आहे. अंजनीले राधिकाने घातलेली ज्वेलरी वर्ष 2020 मध्ये आपल्या लग्नसोहळ्यावेळी घातली होती. एवढेच नव्हे राधिकाचा मांगटिका, हाथफूल आणि कानातले देखील अंजलीचेच होते.

विदाईवेळी लेहेंगा
लग्नसोहळ्यात गुजराती स्टाइल लेहेंगा परिधान केल्यानंतर राधिकाने विदाईवेळी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला बनारसी लेहेंगा परिधान केला होता. यामध्ये राधिका अत्यंत सुंदर दिसत होती. राधिकाचे दोन्हीही लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
राधिकाचा सोन्याचा ब्लाऊज
विदाईवेळी राधिकाने सोन्यापासून आणि करचोबी वर्क केलेला ब्लाऊज परिधान केला होता. एकूणच राधिकाचे आउटफिट सोन्याने तयार केलेले होते. याचे डिझाइन पारंपारिक आभो (कुर्ता) आणि कच्छ, गुजरातमधील ट्रेडिशनचे होते.
आणखी वाचा :
