सार

Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंट काही काळानंतर लग्न करणार आहेत. लग्नाआधी अनंतच्या लग्नाची वरात निघाली, ज्यात स्वतः अनंत जोमाने नाचताना दिसला. त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

 

Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंट काही तासांत 7 फेऱ्या घेतल्यानंतर लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाआधी अनंतच्या लग्नाची मिरवणूक निघाली, ज्यामध्ये वर अनंतने बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत जोमाने डान्स केला. अनंतचा त्याच्याच लग्नाच्या वरातीत नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका व्हिडिओमध्ये अनंत साऊथचा सुपरस्टार रजनीकांतसोबत डान्स करताना दिसत आहे.

 

View post on Instagram
 

3 वाजता सुरु झालीय बारातची तयारी

अनंत अंबानी राधिकाला आपल्या घरी घेऊन येण्यासाठी तयार आहे. यासाठी बारात तयारी अँटेलियावर दुपारी 3 वाजल्यापासूनच सुरु झाली. आता अंबानी परिवारातील सदस्य जिओ वर्ल्डच्या दिशेने जाण्यासाठी निघाले आहेत. रात्री 8 वाजता वरमाला आणि 9 वाजून 30 मिनिटांनी सप्तपदी सुरु होणार आहे. यावेळी भारतीय परंपरेनुसार ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.

 

View post on Instagram
 

 

14 जुलैला अनंत-राधिकाचा मंगल उत्सव

अंबानी वेडिंग कार्डनुसार 14 जुलैला अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा मंगल उत्सव होणार आहे. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणाऱ्या मंगल उत्सवावेळी देखील भारतीय परंपरेनुसार पाहुण्यांना ड्रेस कोड असणार आहे. यानंतर 15 जुलैला कपलचे ग्रँड रिसेप्शन असणार आहे. वेडिंग रिसेप्शन संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु होणार आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी परदेशातून पाहुणे मुंबईत

अनंत-राधिकाच्या लग्नसाठी देश-विदेशातून पाहुणे मुंबईत दाखल झाले आहेत. आंतरराष्ट्रीय मॉडेल किम कार्दशियन आपल्या बहिणीसोबत मुंबईत आली आहे. याशिवाय लालू प्रसाद यादव संपूर्ण परिवारासह मुंबईत दाखल झाले आहेत. डब्लूडब्लूई स्टार जॉन सीना, ब्रिटेनते माजी पंतप्रधान बोरिस जॉनसनसह काही पाहुणे लग्नसोहळ्याला उपस्थितीत राहणार आहेत.

आणखी वाचा :

Anant Ambani-Radhika Merchant च्या लग्नसोहळ्याला सुरुवात, अंबानी परिवाराची वेन्यूच्या येथे शाही एण्ट्री, See Photos