प्रभास नव्हे या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधणार अनुष्का शेट्टी, अभिनेत्रीच्या विवाहाच्या चर्चांना उधाण

| Published : May 18 2024, 05:19 PM IST

anushka shetty
प्रभास नव्हे या व्यक्तीसोबत लग्नगाठ बांधणार अनुष्का शेट्टी, अभिनेत्रीच्या विवाहाच्या चर्चांना उधाण
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

South Movie : दाक्षिणात्य सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी लवकरत लग्नगाठ बंधणार असल्याची चर्चा जोरदार सुरू झाली आहे. यामुळे अनुष्काच्या चाहत्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.

Entertainment : दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी कोणत्या ना कोणत्या कारणास्तव नेहमची लाइमलाइटमध्ये असते. अशातच बातमी येतेय की, अनुष्का शेट्टी लवकरत विवाहबंधनात अडकणार आहेत. याशिवाय रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्री प्रभास नव्हे एका कन्नड सिनेमाच्या प्रोड्युसरसोबत लग्न करणार आहे. अनुष्का शेट्टीचा साखरपुडा झाल्याचेही बोलले जात आहे.

अनुष्का शेट्टी कधी करणार विवाह?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का आणि फिल्म प्रोड्युसरचा विवाह यंदाच्या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. खरंतर, लग्नाची तारीख आधीच ठरली आहे. पण याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अनुष्काच्या विवाहाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रिपोर्ट्समध्ये पुढे म्हटलेय की, ज्या प्रोड्यूसरसोबत अनुष्काचा विवाह होणार आहे त्याचे वय 42 वर्ष आणि अभिनेत्रीचे वयही 42 वर्षच आहे.

दरम्यान, गेल्या काही काळापासून अनुष्का आणि प्रभासच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू होत्या. हे दोघेजण एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्नही करणार असल्याचे बोलले जात होते. पण अनुष्काने नेहमीच प्रभासला तिचा उत्तम मित्र मानले आहे.

अनुष्का शेट्टीच्या कामाबद्दल थोडक्यात…
अनुष्का शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अभिनेत्रीने 18 वर्षांच्या करियरमध्ये 50 हून अधिक सिनेमे केले आहेत. अनुष्काने वर्ष 2005 मध्ये 'सुपर' सिनेमातून टॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. यानंतर अभिनेत्रीने आयुष्यात कधीच मागे वळून पाहिले नाही.

आणखी वाचा : 

25 दिवसानंतर घरी परतले तारक मेहतामधील 'सोढी', पत्नीने दिली अशी प्रतिक्रिया

उर्वशी रौतेलाने दीपिकाचा लुक केला कॉपी, Cannes मधील फोटो व्हायरल