सार

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आई होणार आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या प्रेग्नेंसीबद्दलची माहिती दिली आहे.

Deepika Padukone Announce Pregnancy :  गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या प्रेग्नेंसीबद्दल जोरदार चर्चा सुरू होती. बाफ्टा अवॉर्ड्स 2024 वेळी देखील दीपिका पादुकोणचे बेबी बंप दिसत असल्याचे चाहत्यांनी नोटीस केले होते. त्यावेळी दीपिका आपले बेबी बंप लपवताना दिसली. यानंतरही दीपिका पादुकोणला मुंबई विमानतळावर पाहिले असता तेव्हा देखील तिचे बेबी बंप दिसत होते. यामुळे दीपिका प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना वेग आला होता. अशातच आज (29 फेब्रुवारीला) दीपिका आणि रणवीरने आमच्या घरी येत्या सप्टेंबर 2024 रोजी चिमुकल्या बाळाचे आगमन होणार असल्याची एक गोड पोस्ट शेअर केली आहे.

कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
दीपिकाने सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर आपल्या प्रेग्नेंसीची माहिती दिली आहे. याशिवाय सप्टेंबर 2024 ला चिमुकला पाहुणा घरी येणार असल्याचे पोस्टमध्ये लिहिले आहे. दीपिकाच्या या पोस्टवर कलाकारांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरूवात केली आहे. मनीष मल्होत्रा, मेधा शंकर, अंगद बेदी, मसाबा गुप्तासह अन्य कलाकार आता दीपिकाला येणाऱ्या बाळासाठी शुभेच्छा देत आहेत. याशिवाय दीपिकाच्या चाहत्यांनीही आनंद व्यक्त करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

View post on Instagram
 

वर्ष 2018 मध्ये दीपिका-रणवीरचा विवाह
दीपिका आणि रणवीर सिंह यांच्या रिलेशनशिपची सुरूवात ‘रामलीला’ सिनेमापासून झाली होती. वर्ष 2012 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली होती. वर्ष 2018 मध्ये कपलने इटलीमध्ये विवाह केला होता.

आणखी वाचा : 

अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा कुठे आहेत? कोर्टाने घोषित केले फरार

रणवीर सिंहच्या DON 3 सिनेमाचे बजेट ऐकून व्हाल हैराण

5 सिनेमे, 3 लग्न आणि 225 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे हा TV अभिनेता