Anant-Radhika 2nd Pre Wedding : दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी पाहुण्यांची लगभग सुरू, सलमान खानही रवाना

| Published : May 27 2024, 11:14 AM IST

Salman Khan out for Anant-Radhika 2nd Pre-wedding

सार

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह जुलै महिन्यात पार पडणार आहे. याआधी दोघांचे दुसरे ग्रँड प्री-वेडिंग होणार आहे. यासाठीच पाहुण्यांची आता लगभग सुरू झाली आहे.

Anant-Radhika 2nd Pre Wedding : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह जुलै महिन्यात पार पडणार आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे अनंत आणि राधिकाचा ग्रँड प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. यासाठी देश-विदेशातील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. अशातच रिपोर्ट्सनुसार, अनंत आणि राधिकाचे दुसरे प्री-वेडिंग होणार असून त्यासाठी पाहुण्यांचे आगमन होण्यास सुरूवात झाली आहे.

मुकेश आणि राधिकाचे दुसरे प्रीवेडिंग
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसरे प्री-वेडिंग 28 ते 30 मे दरम्यान पार पडणार आहे. यावेळी पाहुण्यांमध्ये सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट उपस्थितीत राहू शकतात. दुसऱ्या प्री-वेडिंगसाठी सलमान खान स्पेनसाठी रवानाही झाला आहे. सलमानला मुंबईतील कलिना विमानतळावर स्पॉट करण्यात आले.

सलमान खानसह त्याचा भाजा निर्वाण खानला देखील विमानतळावर पाहिले गेले. अशातच दोघेही प्री-वेडिंगला उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. याशिवाय महेंद्र सिंह धोनीसह पत्नी साक्षी देखील स्पेनसाठी रवाना झाले आहेत.

माल्टा येथून सेलिब्रेटी एसेंट क्रुजची व्यवस्था
अनंत आणि राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगासाठी एक भव्य-आलिशान क्रुजची व्यवस्था करण्यात आली आहे. या क्रुजचे नाव सेलिब्रेटी एसेंट आहे. सूत्रांनुसार, अंबानी परिवार मियामी येथून क्रुज मागवणार होता. पण फ्रान्समध्ये क्रुज पार्क करण्यासाठी समस्या येत होती. अशातच मियामीएवजी माल्टा येथून सेलिब्रेटी एसेंट क्रुज मागवण्यात आले आहे. या क्रूजची कॅपॅसिटी 3279 आहे. पण प्री-वेडिंग सेरेमनीसाठी 800 पाहुणे उपस्थिती लावण्याची शक्यता आहे. यामध्ये 300 VVIP सहभागी होण्याची शक्यता आहे.

इटलीच्या पोरटोफिनेमध्ये होणार शाही लंच
अंबानी परिवार आपल्या 800 पाहुण्यांसह इटलीमधील पालेर्मो शहरापासून आपला प्रवास सुरू करणार आहे. 2700 वर्षांआधी वसलेल्या पालेर्मो शहर सिसिली आयलँडची राजधानी आहे. हे शहर इटलीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा हिस्सा आहे. याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुकलेचा वारसा लाभलेला आहे.

याशिवाय क्रुजचा पुढचा प्रवास जिनेव्हाजवळी पोरटोफिनो शहराकडे असणार आहे. या शहरात अंबानी परिवाराने आपल्या पाहुण्यांसाठी खास लंचचे आयोजन केल आहे. यासाठी पोरटोफिनोमधील काही व्हिला भाड्यावर घेण्यात आले आहेत.

आणखी वाचा : 

3 खान आणि हे कपल्स, अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंग गेस्ट लिस्टमध्ये कोणा-कोणाचा समावेश? वाचा सविस्तर

Bigg Boss OTT 3 : प्रीमियरची तारीख अखेर ठरली... या दिवशी प्रदर्शित होणार शो, सलमान नव्हे हा स्टार करणार सूत्रसंचालन