Alka Yagnik गंभीर आजाराने ग्रस्त, गायिकेला दोन्ही कानांनी ऐकू न येणे झालेय बंद

| Published : Jun 18 2024, 01:28 PM IST / Updated: Jun 18 2024, 01:44 PM IST

Alka Yagnik Diagnosed With Rare Hearing Disorder

सार

Alka Yagnik Instagram Post : बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका अलका आग्निक एका गंभीर आजाराने ग्रस्त झाल्या आहेत. यामुळे अलका यांना दोन्ही कानांनी ऐकणे बंद झाले आहे. याच संदर्भातील एक मोठी पोस्ट अलका यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

Alka Yagnik diagnosed with rare sensory hearing loss : 90's मधील बॉलिवूडमधील काही सुपरहिट गाण्यांना आवाज देणाऱ्या गायिका अलका याग्निक सध्या एका गंभीर आजाराचा सामना करत आहेत. याच संदर्भातील माहिती स्वत:हून अलका यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रावर याची माहिती दिली आहे. यामुळे अलका आग्निक यांच्या चाहत्यांकडून त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

अलका आग्निक यांची इंस्टाग्रामवरील पोस्ट
अलका आग्निक यांनी इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये अलका म्हणतात, माझे सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि शुभचिंतक. गेल्या काही आठवड्यापूर्वी ज्यावेळी मी विमानातून बाहेर आली तेव्हा अचानक मला काहीही ऐकू येत नसल्याचे जाणवले. खरंतर, मनाला धीर देत आता मित्रपरिवार आणि शुभचिंतकांना माझ्या आजाराबद्दल सांगतेय. खूपजण विचारतायत कुठे गायब आहेस.

पुढे म्हणाल्या की, “डॉक्टरांकडून एक दुर्मिळ अशी सेंसरी नर्व हिअरिंग लॉसवर उपचार घेतले आहेत. हा आजार एका व्हायरल अटॅकमुळे झाला आहे. या गंभीर आजाराने मला धक्का बसला आहे. याला आता स्विकार करण्याचा प्रयत्न करतेय. तुमचे आशीर्वाद पाठिशी असू द्या.”

View post on Instagram
 

अलका आग्निक यांनी दिला सल्ला
चाहते आणि अन्य गायकांना सल्ला देत अलका आग्निक म्हणतात की, हेडफोन्स आणि जोरजोरात वाजणाऱ्या म्युझिकसंदर्भात एक सल्ला देऊ इच्छिते. एखाद्या दिवसी माझ्या प्रोफेशनल लाइफमुळे आरोग्याला होणाऱ्या नुकसानीबद्दल जरुर बोलेन. तुमचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे माझे आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत होईल अशी अपेक्षा करते. सध्याच्या बिकट काळात तुमचा पाठिंबा आणि समजूतदारपणा माझ्यासाठी फार मोलाचा आहे.

अलका याग्निक यांच्या कामाबद्दल…
अलका याग्निक बॉलिवूडच नव्हे देशातील प्रसिद्ध गायिकांपैकी एक आहेत. 25 हून अधिक भाषांमध्ये 21 हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केलेल्या अलका याग्निक यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 

आणखी वाचा : 

शाहरुख खानने 1 रुपयात साइन केला होता 'Nayak' सिनेमा, सोडण्यामागील ठरले हे कारण

दीपिका, आलिया की कतरिना? भारतात सर्वाधिक फी घेणारी ही Actress