शाहरुख खानने 1 रुपयात साइन केला होता 'Nayak' सिनेमा, सोडण्यामागील ठरले हे कारण

| Published : Jun 18 2024, 10:58 AM IST / Updated: Jun 18 2024, 11:13 AM IST

shahrukh khan avoiding paparazzi since 2021

सार

Shah Rukh Khan Video : बॉलिवूडमधील किंग खानचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शाहरुख खानने त्याला सिनेमा साइन करण्यासाठी किती रुपये मिळाले होते याचा खुलासा केला आहे.

Shah Rukh Khan Old Video Viral : बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुखने आपल्या करियरमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. शाहरुखने सिनेसृष्टीतील करियरमध्ये काही सिनेमांसाठी नकार दिल्यानंतर अन्य एखाद्या स्टारला घेऊन तो निर्मात्यांनी केला. हेच सिनेमे नंतर सुपरहिटही झाले. यापैकीच एक सिनेमा म्हणजे 'नायक' (Nayak Movie) आहे. खरंतर, नायक सिनेमा शाहरुख खानला घेऊन केला जाणार होता. पण अनिल कपूरला (Anil Kapoor) सिनेमात घेतले आणि सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे दिसून आले.

शाहरुखचा जुना व्हिडीओ व्हायरल
शाहरुख खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेत्याने सांगितले होते की, नायक सिनेमासाठी त्याला साइनिंग रक्कम किती मिळाली होती. याशिवाय सिनेमा करण्यासाठी नकार का दिला याचे कारणही शाहरुखने सांगितले होते.

रिपोर्ट्सनुसार, शाहरुखने वर्ष 2022 मध्ये रेडिफला एक मुलाखत दिली होती. यावेळी शाहरुखने म्हटले होते की, नायक सिनेमासाठी मला केवळ एक रुपया साइनिंग रक्कम दिली होती. याशिवाय निर्माते शंकर यांनी ज्यावेळी गरज भासेल तेव्हा सिनेमासाठी सांगू असेही म्हटले होते.

शाहरुखने सांगितला किस्सा
शाहरुखने म्हटले की, आम्ही एकत्रित नायक सिनेमा करणार होतो. मी तमिळमधील मूळ सिनेमा पाहिला आणि मला आवडला. पण नायकच्या तमिळमधील हिंदी वर्जनसाठी कंम्फर्टेबल नव्हतो. यामुळे दिग्दर्शक शंकर यांना सांगितले, मुख्यमंत्रीचे पात्र उत्तर भारत आपली छाप पाडणार नाही. यामुळेच शाहरुखने सिनेमा सोडला.

अनिल कपूरचे कास्टिंग
शाहरुखने नायक सिनेमा सोडल्यानंतर अनिल कपूर यांचे कास्टिंग करण्यात आली. वर्ष 2001 मध्ये सिनेमा प्रदर्शित केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर आपटला होता. पण कालांतराने प्रेक्षकांना सिनेमा आवडला. आज अनिल कपूर यांच्या करिरमधील सर्वाधिक हिट ठरलेल्या सिनेमांमध्ये नायकचे नाव आवर्जुन घेतले जाते.(Anil Kapoor Super Hit Movie)

नायक सिनेमाची कथा
वर्ष 2011 मध्ये आलेल्या नायक सिनेमा तमिळमधील पॉलिटिकल थ्रिलर सिनेमा Mudhalvan चा हिंदी रिमेक होता. यामध्ये अनिल कपूरने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. जो एका दिवसासाठी मुख्यमंत्री झाला आहे. याशिवाय अमरीश पुरी यांनी भ्रष्टाचारी मुख्यमंत्र्यांची भूमिका साकारली होती. सिनेमात राणी मुखर्जी आणि परेश रावल अशी तगडी स्टारकास्टही होती.

आणखी वाचा : 

दीपिका, आलिया की कतरिना? भारतात सर्वाधिक फी घेणारी ही Actress टॉपवर

Pushpa 2 Release Date : अल्लू अर्जुनचा नवा सिनेमा प्रदर्शित होण्याची तारीख अखेर ठरली, या दिवशी होणार रिलीज