Alia Bhatt चा आणखी एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल, चाहते चिंतेत

| Published : Jun 15 2024, 01:05 PM IST

Alia Bhatt AI Video

सार

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा पुन्हा एकदा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओला 20 दशलक्षहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

बॉलिवूडमधील अभिनेत्री आलिया भट्टचा आणखी एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आलियाच्या नव्या डीपफेक व्हिडीओमुळे चाहते चिंतेत पडले आहेत. अभिनेत्रीचा व्हायरल झालेला व्हिडीओ 'गेट रेडी विद मी' चा आहे. याा व्हिडीओला आतापर्यंत 20 दशलक्षहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. आलियाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांनी आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा चुकीचा वापर केला जात असल्यावर चिंता व्यक्त केली आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहेत.

डीपफेक व्हिडीओ नक्की काय आहे?
पिंकविलाच्या रिपोर्ट्सनुसार, Sameeksha Avter नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर आलियाचा डीपफेक व्हिडीओ शेअर केला आहे या इंस्टाग्राम युजरने बायोमधअये लिहिले आहे की, आर्टिफिशिअल इंटेलिजेंसचा वापर करुन तयार केलेले सर्व व्हिडीओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार केले आहेत. आलिया भट्टचा चेहरा वापरुन तयार केलेल्या व्हिडीओमधील व्यक्तीने काळ्या रंगातील कुर्ता परिधान केला आहे.

View post on Instagram
 

व्हिडीओवर चाहत्यांच्या प्रतिक्रिया
डीपफेक व्हिडीओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी व्हिडीओवर चिंता व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले की, आर्टिफिशिअल इंटेलिजेंस अत्यंत धोकादायक आहे. दुसऱ्याने म्हटले की, हे कायदेशीर आहे का?, तिसऱ्याने म्हटले की, सध्या आर्टिफिशिअलचा जमाना आहे.

आणखी वाचा :

Fake मारहाणीचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीविरोधात रवीना टंडनचे मोठे पाऊल, गुन्हा दाखल करत 100 कोटींची मागणी

11 वर्षांमध्ये कार्तिक आर्यनचे केवळ 7 सिनेमे HIT, पाहा लिस्ट