Fake मारहाणीचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीविरोधात रवीना टंडनचे मोठे पाऊल, गुन्हा दाखल करत 100 कोटींची मागणी

| Published : Jun 15 2024, 12:19 PM IST / Updated: Jun 15 2024, 12:29 PM IST

Raveena Tondon
Fake मारहाणीचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीविरोधात रवीना टंडनचे मोठे पाऊल, गुन्हा दाखल करत 100 कोटींची मागणी
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अभिनेत्री रवीना टंडनने नुकत्याच एका व्यक्तीच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय व्यक्तीला नोटीसही धाडली आहे.

Entertainment : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनचा (Raveena Tandon) काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती. खरंतर, व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने रवीनावर आरोप लावत असे म्हटले होते की, अभिनेत्रीने नशेत त्याच्या व्यक्तीसोबत दुर्व्यवहार केला होता. याशिवाय काहींना कारने धडकही दिली होती. दरम्यान, पोलिसांच्या तपासात रवीनाच्याच कारने धडक दिल्याचे समोर आले नाही. अशातच रवीनाने व्यक्तीच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानिचा गुन्हा दाखल करत नोटीस धाडली आहे.

रवीनाच्या वकीलांनी काय म्हटले?
रवीना टंडनचे वकील सना रईस खान यांनी म्हटले की, नुकत्याच रवीनाच्या विरोधात एक खोटी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, नुकत्याच एका व्यक्तीने स्वत:ला पत्रकार समजत घटनेची चुकीची माहिती सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर व्हायरल करत होता.

रवीना टंडनने धाडली नोटीस
रवीना टंडनने आपल्या नोटीसमध्ये व्यक्तीच्या विरोधात सोशल मीडियावर बनावट बातम्या देण्यासह बदनामी करण्याचा आरोप लावल्याचे म्हटले आहे. याशिवाय सर्वांच्या समोर अपमानजनक वागणूक देणे आणि मानसिक समस्येचा त्रास करावा लागला असेही रवीनाने म्हटले आहे.

रवीनाच्या वकील सना रईसने म्हटले की, खोट्या बातम्यांच्या माध्यमातून रवीनाचे व्यक्तीमत्त्व मुद्दाम खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवास स्वस्तात प्रसिद्धी मिळवण्यासाठी असे केल्याचे दिसून येत असल्याचेही वकीलांनी म्हटले आहे. सध्या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी कायदेशीर पावले उचलत आहोत.

रवीनाच्या कामाबद्दल थोडक्यात…
रवीना टंडनच्या वर्कफ्रंडबद्दल बोलायचे असल्यास नुकत्याच ‘कोर्टरुम ड्रामा वेब सीरिज पटना शुक्ला’ मध्ये दिसून आली होती. अभिनेत्री आगामी सिनेमा वेलकम टू द जंगलमध्ये दिसणार आहे. यामध्ये अक्षय कुमार, अरशद वारसी, दिशा पाटनी, लारा दत्ता आणि परेश रावल यांच्यासह काही स्टार्स झळकणार आहेत.

आणखी वाचा : 

11 वर्षांमध्ये कार्तिक आर्यनचे केवळ 7 सिनेमे HIT, पाहा लिस्ट

Chandu Champion Day 1 : कार्तिक आयर्नच्या सिनेमाने किती कमावले?