Entertainment

11 वर्षांमध्ये कार्तिक आर्यनचे केवळ 7 सिनेमे HIT, पाहा लिस्ट

Image credits: Facebook

कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पिनय सिनेमा

कार्तिक आर्यन स्टारर चंदू चॅम्पियन सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या सिनेमातील कार्तिकच्या भूमिकेने प्रेक्षकांवर छाप पाडलीय.

Image credits: Facebook

कार्तिकचे बॉलिवूडमधील करियर

कार्तिक आर्यनच्या बॉलिवूडमधील करियरला 11 वर्षे झाली आहे. यादरम्यान, अभिनेत्याने 15 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलेय. पण कार्तिकचे काही सिनेमे हिट ठरले नाहीत.

Image credits: instagram

कार्तिक आर्यनचा डेब्यू

कार्तिक आर्यनने वर्ष 2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि कार्तिकला इंडस्ट्रीमध्ये ओखळ मिळाली.

Image credits: instagram

फ्लॉप सिनेमे

कार्तिक आर्यनचा पहिला सिनेमा हिट झाल्यानंतर सातत्याने पुढील दोन सिनेमे फ्लॉप झाले. कार्तिकचा आकाशवाणी आणि कांची सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला गेला.

Image credits: instagram

या सिनेमाची पुन्हा चाचली जादू

दोन सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर कार्तिक आर्यनचा वर्ष 2015 मध्ये आलेला ‘प्यार का पंचनामा-2’ हिट ठरला. यानंतर एकच सिनेमा सोडला तर एकामागोमाग एक सिनेमे हिट ठरले.

Image credits: instagram

कार्तिक आर्यनचा तिसरा हिट सिनेमा

वर्ष 2018-19 मध्ये आलेला कार्तिक आर्यनचे सिनेमे ‘सोनू के टीटू की स्विटी’, ‘लुका छिपी’ आणि ‘पति पत्नी और वो’ हिट ठरले. या तिन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती.

Image credits: instagram

भूल भुलैया-2 सिनेमाची जादू

वर्ष 2022 मध्ये आलेला कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया-2’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. कार्तिकच्या करियरमधील हा पहिलाच सिनेमा होता ज्याने 200 कोटींचा टप्पा पार गेला होता. 

Image credits: Facebook

आगामी सिनेमे

कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाल्यास ‘भूल भुलैया-3’, ‘आशिकी-3’, ‘दोस्ताना-2’ सारख्या सिनेमांमध्ये झळकणार आहे. हे सिनेमे वर्ष 2024-25 दरम्यान प्रदर्शित होणार आहेत.

Image credits: instagram