सार

Entertainment : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बच्चन परिवारात फूट पडल्याची चर्चा जोरदार सुरू होती. अशी ही चर्चा होती की, ऐश्वर्या राय हिने सासर सोडले आहे. या सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

बॉलिवूड मधील अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात तणावाची स्थिती निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. ऐवढेच नव्हे ऐश्वर्याने सासर सोडल्याचीही अफवा आली. या सर्व गोष्टींना आता पूर्णविराम मिळाला असून संपूर्ण बच्चन परिवाराला एकत्रित स्पॉट करण्यात आले. यावेळी ऐश्वर्या देखील उपस्थितीत होती.

धीरूभाई अंबानी इंटरनॅशल स्कूलमध्ये (Dhirubhai Ambani International School) अ‍ॅन्युअल फंक्शनचे (Annual Function) आयोजन करण्यात आले होते. या शाळेत ऐश्वर्याची लेक आराध्या (Aaradhya Bachchan) शिकत आहे. या फंक्शनसाठी अमिताभ बच्चन, आराध्या, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या सर्वांना शाळेबाहेर एकत्रित स्पॉट करण्यात आले.

याशिवाय फंक्शनसाठी शाहरूख खान, गौरी खान, सुहाना खान, करण जौहर, शाहिद कपूर ते मीरा राजपूत सारख्या सेलेब्सनेही उपस्थिती लावली होती. याच दरम्यान, संपूर्ण बच्चन परिवार आराध्यासाठी शाळेत आले होते.

VIDEO: आराध्याचा शाळेतील फंक्शनवेळचा परफॉर्मेन्स 

View post on Instagram
 

बच्चन परिवारात फूट पडल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम

बच्चन परिवारात फूट पडल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. आराध्याच्या शाळेतील फंक्शनला संपूर्ण बच्चन परिवाराला एकत्रित पाहिले गेले. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या व्यतिरिक्त फंक्शनसाठी श्वेता नंदा हिचा मुलगा अगस्त्य नंदा देखील आला होता.

View post on Instagram
 

 

View post on Instagram
 

 

आणखी वाचा: 

Ram Mandir Ceremony : अक्षय-माधुरीसह या कलाकारांनाही निमंत्रण, यादी आली समोर

जगभरात या बॉलिवूड अभिनेत्रीला Googleवर सर्वाधिक केले गेले सर्च

Shreyas Talpade Health Update: श्रेयस तळपदेवर करण्यात आली अँजिओप्लास्टी, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती