'मानव शिवाय अर्चना काहीच नाही' म्हणत... अंकिता लोखंडेने शेअर केली भावनिक पोस्ट

| Published : Jun 02 2024, 11:49 AM IST / Updated: Jun 02 2024, 11:52 AM IST

Ankita sushant

सार

'पवित्र रिश्ता' या मालिकेला नुकतेच 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अभिनेत्री अंकिता लोखंडेनं इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याचसोबत तिने सुशांतसोबतचे मालिकेतील काही फोटो पोस्ट केले आहेत.

टीव्ही सिरीयल मधील सर्वात लोकप्रिय असलेली ‘पवित्र रिश्ता’ला 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. या मालिकेमुळे अनेक कलाकारांचं आयुष्य बदललं. यामध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने मुख्य भूमिका साकारल्या होत्या. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.आजही मानव आणि अर्चना आजही ही जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. आता मालिकेला 15 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अंकिताने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. मालिकेतील सुशांतसोबतचे काही फोटोसुद्धा तिने पोस्ट केले आहेत.

अंकिताने पोस्टमध्ये काय लिहिलंय :

‘ही 15 वर्षे फक्त अर्चनाची नाहीत, तर ही 15 वर्षे अर्चना आणि मानव या दोघांची आहेत. प्रेम, विवाह, समजूतदारपणा आणि सहवास दर्शविणारी ही जोडी आहे. ते दोघेही परफेक्ट होतेच. त्यांच्याकडे पाहून आपलं नातं असं असावं असं म्हणत. परिपूर्ण विवाह म्हणजे काय हे यातून मला शिकायला मिळालं. मला खात्री आहे की अर्चना आणि मानव यांच्यासारखी खरी, गोड आणि अप्रतिम ऑनस्क्रीन जोडी आजवर बनलीच नाही. या सर्वांचं श्रेय प्रेक्षकांना जातं, ज्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं. अर्थातच एकता मॅडम यांनी आमच्यावर केलेल्या विश्वासामुळेच आम्ही स्क्रीनवर ती जादू निर्माण करू शकलो आहोत. असं तिने तिच्या पोस्ट मध्ये म्हंटल आहे.

View post on Instagram
 

सुशांतच्या आठवणी केल्या ताज्या :

या मालिकेत मानव आहे म्हणून अर्चना आहे. तसेच अर्चनाचे ज्या ज्या वेळी घेतले जाईल त्या त्या वेळी मानवची आठवण काढली जाईल याची मला खात्री आहे. कारण त्या दोघांमधील ‘पवित्र रिश्ता’ हा तुम्हा सर्वांसोबत असलेल्या माझ्या ‘पवित्र रिश्ता’इतकाच शुद्ध होता. त्याच्या मार्गदर्शनाशिवाय आज मी जशी आहे, तशी बनली नसते. मानवशिवाय अर्चनाचं अस्तित्वच नाही. हे जितकं माझं सेलिब्रेशन आहे, तितकंच त्याचंही आहे. तू जे काही साध्य केलंस आणि अभिनयात तू जे यश संपादित केलंस, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे’, अशा शब्दांत अंकिताने भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच शेवटी मिस यू सुशांत लिहिले आहे.

आणखी वाचा :

मद्यधुंद अवस्थेत दिसली रविना टंडन केलं असं काही की...समोरच्याने गाठले पोलीस ठाणे

क्रिकेटर शुभमन गिल डिसेंबरमध्ये रिद्धिमा पंडितसोबत विवाह करणार? TV अभिनेत्री म्हणाली…