गीतरामायणा’तील गोडव्याने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

| Published : Apr 17 2024, 03:07 PM IST

swargandharv-sudhir-phadke
गीतरामायणा’तील गोडव्याने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

गीतरामायणा’तील गोडव्याने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे स्वरगंधर्व सुधीर फडके ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. 

गीतरामायणा’तील गोडव्याने मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे स्वरगंधर्व सुधीर फडके… मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेलं एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक ठसा उमटवला. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या गायकीने आणि संगीताने प्रेक्षकांना भुरळ घातली. अशा या रसिकमनाचा ठाव घेणाऱ्या ‘बाबुजीं’ची जीवनगाथा सांगणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट येत्या १ मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. रामनवमीच्या पूर्वसंध्येला या चित्रपटाचा भव्य ट्रेलर लाँच सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील टीमसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात चित्रपटातील ‘गीतरामायण’मधील बहारदार गाणी ऐकायला मिळाली.

View post on Instagram
 

 

बाबूजींचा जीवनप्रवास उलगडणारा चित्रपट :

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या निमित्ताने बाबुजी आणि त्यांच्याबरोबर काम केलेल्या अनेक नामवंताची असंख्य गाणी व जीवनप्रवास या माध्यमातून उलगडणार आहे. या चित्रपटात एकूण 27 गाणी असून या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अनोखा संगीत नजराणा मिळणार आहे. चित्रपटाची निर्मिती सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे यांनी केली आहे. 

कोणते कलाकार दिसणार :

सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट योगेश देशपांडे यांनी दिग्दर्शित केला असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवादही त्यांचेच आहेत.

काय आहे चित्रपटाची कथा?

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या २ मिनिटे ४५ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये बाबुजींची कथा दाखवण्यात आली आहे. करिअरच्या सुरुवातीला जेव्हा ते मुंबईत आले तेव्हा त्यांना अनेक गोष्टी सोसाव्या लागल्या होत्या. एक वेळ तर अशी आली की त्यांनी हॉटेलमध्ये देखील काम करावे लागले होते. अगदी शेवटी हतबल होऊन मुंबई सोडत असताना त्यांना एक उत्तम संधी मिळते आणि ते या संधीचे सोने करताना दिसत आहेत. सुधीर फडके यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारली आहे. ट्रेलरमध्ये भारत स्वातंत्र्य होतानाचा देखील काळ दाखवण्यात आला आहे. एकंदरीतच चित्रपटाचा ट्रेलर हा उत्सुकता वाढवणारा आहे. त्यामुळे चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.

आणखी वाचा :

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखेने असा लावला आरोपींचा छडा

मुंबईत पूजा हेगडेने घेतला बॉलिवूडमधील सर्वात महागडा फ्लॅट, किंमत ऐकून व्हाल थक्क