अभिनेते राकेश बेदी यांची ऑनलाइन फसवणूक, सैन्यातील अधिकारी असल्याचे सांगत घातला 85 हजारांचा गंडा

| Published : Jan 02 2024, 03:35 PM IST / Updated: Jan 02 2024, 03:40 PM IST

Rakesh Bedi

सार

अभिनेते राकेश बेदी यांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. फोनवरील व्यक्तीने राकेश बेदी यांना स्वत:ची सैन्य अधिकारी म्हणून ओखळ करून देत गंडा घातला आहे.

Online Fraud : प्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी (Rakesh Bedi) यांची पैशांसंबंधित ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. खरंतर राकेश यांना 85 हजार रूपयांचा गंडा घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबद्दलची माहिती स्वत: राकेश यांनी एका मुलाखतीत दिली.

राकेश यांनी म्हटले की, एका व्यक्तीने आपण सैन्यातील अधिकारी असल्याचे सांगत माझी हजारो रूपयांची फसवणूक केली. याबद्दल राकेश यांनी ओशिवरा पोलीस स्थानकात (Oshiwara Police Station) तक्रार दाखल केली आहे.

राकेश बेदींची ऑनलाइन फसवणूक
राकेश बेदी यांनी म्हटले की, “आदित्य कुमार या नावाने एका व्यक्तीचा फोन आला होता. या व्यक्तीने फोनवरुन स्वत:ला सैन्यातील अधिकारी असल्याचे सांगितले. यानंतर व्यक्तीने राकेश बेदी यांच्याकडे घराचे काही फोटोही मागितले. पण फोनवरील व्यक्ती आपली फसवणूक करतोय हे कळण्याआधीच माझ्या खातात्यून 85 हजारांची रक्कम काढली होती.” या फसवणूकीबद्दल राकेश बेदी यांनी ओशिवरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.

राकेश यांनी पुढे म्हटले की, पोलिसांकडे फोनवरील व्यक्तीची संपूर्ण माहिती दिली आहे. याशिवाय त्या व्यक्तीचा बँक खाते क्रमांकही पोलिसांना दिला आहे. जेणेकरुन नागरिक अशा प्रकारच्या फसवणूकदारांपासून दूर राहतील.

कोण आहेत राकेश बेदी?
राकेश बेदी हे उत्तम कलाकार असून त्यांनी 'खट्टा मीठा', 'प्रोफेसर की पड़ोसन' 'गदर-2' सारख्या सिनेमात काम केले आहे. याशिवाय राकेश बेदी 'श्रीमन श्रीमती', 'ये जो है जिंदगी' सारख्या टेलिव्हिजन मालिकांमध्येही झळकले आहेत.

आणखी वाचा: 

2024 मध्ये प्रदर्शित होणार देशातील हे 11 बिग बजेट सिनेमे

SHOCKING: सुपरस्टार विजयकांत यांच्या अंत्यसंस्कारावेळी थलापति विजयला चप्पल फेकून मारली?

Ranbir Kapoor Viral Video : रणबीर कपूर अडकला वादाच्या भोवऱ्यात, धार्मिक भावना दुखावल्याने पोलिसात तक्रार दाखल