Ranbir Kapoor Viral Video : रणबीर कपूर अडकला वादाच्या भोवऱ्यात, धार्मिक भावना दुखावल्याने पोलिसात तक्रार दाखल

| Published : Dec 28 2023, 09:49 AM IST / Updated: Dec 28 2023, 09:55 AM IST

ranbir kapoor hurt religious sentiments
Ranbir Kapoor Viral Video : रणबीर कपूर अडकला वादाच्या भोवऱ्यात, धार्मिक भावना दुखावल्याने पोलिसात तक्रार दाखल
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अभिनेता रणबीर कपूर आणि त्याच्या परिवाराच्या विरोधात हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर....

Ranbir Kapoor Viral Video : रणबीर कपूर आणि त्याचा परिवार वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. खरंतर ख्रिसमसचे सेलिब्रेशन (Christmas Celebration) करतानाचा रणबीरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रणबीर ख्रिसमससाठीच्या केकवर अल्कोहोल टाकून त्याला आग लावताना जय मातादी बोलताना दिसून येत आहे.

रणबीरच्या या व्हिडिओनंतर बहुतांशजणांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. आता अभिनेत्याच्या विरोधात मुंबईतील घाटकोपर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार वकील संजय तिवारी यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आशीष राय आणि पंकज मिश्रा यांच्या माध्यमातून केली आहे.

तक्रारीत काय म्हटले आहे?
वकील संजय तिवारी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले, अभिनेत्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेता केकवर अल्कोहोल टाकून त्याला आग लावताना जय मातादी बोलत आहे. याशिवाय परिवारातील अन्य सदस्यांनी देखील ‘जय माता दी’चा जयघोष केला.

रणबीर कपूरने आपल्या संपूर्ण परिवारासह ख्रिसमसचे सेलिब्रेशन केले. यावेळीच रणबीरने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याने त्याच्या विरोधात कार्यवाही व्हावी असे संजय तिवारी यांनी म्हटले आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आलिया भट, करिश्मा कपूर, कुणाल कपूर यांच्यासह संपूर्ण कपूर परिवारातील सदस्य दिसून येत होते.

View post on Instagram
 

रणबीरच्या अ‍ॅनिमल सिनेमाची बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
रणबीर कपूरचा यंदाच्या वर्षात (2023) ‘अ‍ॅनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. संदीप वांगा रेड्डी यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून 8 कोटी 50 लाखांहून अधिक कमाई सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली. अ‍ॅनिमल सिनेमात रणबीर कपूर याच्यासह रश्मिका मंदना, अनिल कपूर, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

आणखी वाचा: 

सलमान खानच्या हातातील ब्रेसलेटचे हे आहे रहस्य

पॉप स्टार दुआ लिपा सोशल मीडियात होतेयं ट्रोल, नक्की कारण काय? वाचा सविस्तर...

हृतिक रोशनने या गोष्टीला नकार दिल्यामुळे प्रभास झाला सुपरस्टार