9th Ajanta-Ellora International Film Festival : सिनेरसिकांना पाहता येणार जगभरातील 55 सर्वोत्कृष्ट चित्रपट

| Published : Dec 18 2023, 02:18 PM IST / Updated: Dec 18 2023, 02:30 PM IST

9th Ajanta-Ellora International Film Festival

सार

9th Ajanta-Ellora International Film Festival : नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन 3 जानेवारी ते 7 जानेवारी 2024 दरम्यान करण्यात आले आहे.

9th Ajanta-Ellora International Film Festival : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील सिनेरसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (Ajanta Ellora International Film Festival 2024) घोषणा करण्यात आली आहे. 

पुढील वर्षी 3 जानेवारी 2024 ते 7 जानेवारी 2024 दरम्यान या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर प्रोझोन मॉलमधील आयनॉक्स थिएटर येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत हा महोत्सव संपन्न होणार आहे.

महोत्सवाच्या आयोजनामागील उद्देश

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मुख्य उद्देश म्हणजे चित्रपट कला क्षेत्रातील बारकावे व अन्य माहितीबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि सिनेमाची आवड असणाऱ्या युवा पिढीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून देणे. मराठवाडा (Marathwada) आणि छत्रपती संभाजीनगरचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचवणे यासह अन्य महत्त्वाच्या गोष्टींचाही समावेश आहे.

चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा 

चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा 3 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी एमजीएम परिसरातील रूक्मिणी सभागृह येथे संपन्न होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर. बाल्की यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर पुढील चार दिवस महोत्सव प्रोझोन मॉल येथील आयनॉक्स थिएटरमध्ये पार पडेल.

चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा 

या फेस्टिव्हलचा समारोप सोहळा 7 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी सात वाजता आयनॉक्स प्रोझोन मॉल येथे संपन्न होणार आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सोहळा संपन्न होईल. नाथ स्कुल ऑफ बिजनेस मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी (NSBT), अभ्युदय फाउंडेशन हे या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स या महोत्सवाचे अकॅडेमीक पार्टनर तर एमजीएम रेडिओ एफएम 90.8 हे रेडिओ पार्टनर आहेत.

भारतीय सिनेमा स्पर्धेची माहिती

महोत्सवामध्ये विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश आहे. तसेच पाच राष्ट्रीय पातळीवरील चित्रपट ज्युरी प्रेक्षकांसह पाहणार आहेत. यातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला सुवर्ण कैलास पारितोषिक आणि एक लाख रूपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील यामध्ये समावेश असणार आहे.

ज्युरी मेंबर 

भारतीय सिनेमा स्पर्धा गट ज्युरी समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक धृतिमान चॅटर्जी (Dhritiman Chatterjee) हे असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून प्रसिद्ध छायाचित्रकार डिमो पापोव, ज्येष्ठ दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन, ज्येष्ठ समीक्षक रश्मी दोराईस्वामी आणि प्रसिद्ध छायाचित्रकार हरी नायर हे मान्यवर असणार आहेत.

आणखी वाचा

Bollywood Update : दबंग सलमान खानच्या हिरोईनला जीवे मारण्याची धमकी? नेमके काय आहे सत्य

BOX OFFICEनंतर रणबीर कपूरचा ‘Animal’ OTTवरही धुमाकूळ घालणार, जाणून घ्या DETAILS

SHOCKING! शेजाऱ्याची हत्या करणाऱ्या 'मधुबाला' मालिकेतील या अभिनेत्याला बेड्या