15 ऑगस्टला एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर चार मोठे सिनेमे धडकणार, पाहा लिस्ट

| Published : Jul 30 2024, 08:07 AM IST / Updated: Jul 30 2024, 08:09 AM IST

Stree 2

सार

15th August Movie Release List : येत्या 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी चार मोठे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. लॉन्ग विकेंडचा फायदा सिनेमाला होईल या दृष्टीने निर्मात्यांनी निर्णय घेतला आहे. 

फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे म्हटले जाते की, मोठ्या सिनेमांचे लाइफ केवळ तीन दिवसच असते. सिनेमा शुक्रवारी रिलीज होते आणि शनिवार-रविवारमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो. यानंतरची सिनेमाची खरी कमाई किती होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरते. पण सध्या काही सिनेमे निर्मात्यांकडून राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवशी प्रदर्शित केले जातात. जसे की, ईद, दिवाळी, स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक सिनेमे रिलीज करण्यात आले आहेत. अशातच येत्या 15 ऑगस्टला चार मोठे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.

चार सिनेमे एकाच दिवशी होणार प्रदर्शित
यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बॉलिवूडमधील चार मोठे सिनेमे एकत्रित रिलीज होणार आहेत. हे सिनेमे केवळ हिंदी भाषेतील आहे. देशभरात काही ठिकाणी स्थानिक भाषांमधीलही सिनेमे 15 ऑगस्टला प्रदर्शित केले जाणार आहेत. यंदा अक्षय कुमार, तापसी पन्नू, वाणी कपूर आणि फरदीन खान यांचा ‘खेल खेल मे’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे. याशिवाय शर्वरी वाघ आणि तमन्ना भाटिया यांचा ‘वेदा’ सिनेमा आणि श्रद्धा कपूर, राजकुमार राव व पंकज त्रिपाठी अशी तगडी स्टारकास्ट असणारा ‘स्री-2’ सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. साउथचा ‘डबल आय स्मार्ट’ सिनेमाही स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रदर्शित केला जाणार आहे. हा सिनेमा हिंदी भाषेतही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. डबल आय स्मार्ट सिनेमात राम पोथिनेनी यांच्यासोबत संजय दत्तही झळकणार आहे.

15 ऑगस्टलाच का सिनेमा प्रदर्शित करणार?
राष्ट्रीय सुट्ट्यांचा फायदा घेत निर्माते सध्या सिनेमे प्रदर्शित करत आहेत. यंदाच्यावेळीही राष्ट्रीय सुट्टीनिमित्त चार मोठे सिनेमे वेगवेगळ्या निर्मात्यांकडून प्रदर्शित केले जाणार आहेत. याशिवाय सिनेमा उत्तम कमाई करू शकतो या उद्देशानेही 15 ऑगस्टला रिलीज करण्याचा विचार निर्मात्यांकडून करण्यात आला आहे.

  • 15 ऑगस्ट -स्वातंत्र्य दिन
  • 16 ऑगस्ट - पारसी नवं वर्ष
  • 17 ऑगस्ट - शनिवार
  • 18 ऑगस्ट - रविवार
  • 19 ऑगस्ट - रक्षाबंधन

यावरुन कळते की, काही सिनेमांना पाच दिवसांचा दीर्घ विकेंड कमाईसाठी मिळणार आहे. अशातच सिनेमांच्या कमाईवर थोडाफार परिणाम झालेला दिसून येईल. खरंतर, लॉन्ग विकेंडला बहुतांशजण ट्रिप प्लॅन करतात. यामुळे सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांची कोणता सिनेमा पाहण्यासाठी सर्वाधिक गर्दी होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. याशिवाय 24 ऑगस्टला शनिवार आणि 25 ऑगस्टला रविवार असून 26 ऑगस्टला श्रीकृष्ण जयंती आहे. यामुळे स्पष्ट आहे की, दुसऱ्या आठवड्यातही सिनेमांना सुट्टीचा फायदा होऊ शकतो.

आणखी वाचा : 

Sanjay Dutt च्या सिनेमांमधील 7 गाजलेल्या खलनायकाच्या भूमिका

Orry च्या अंतरंगी हेअरकटची चर्चा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल