पनवेल रेल्वे स्थानकावरून ३६ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी एका नायजेरियन महिलेला अटक करण्यात आली आहे. मंगला एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या महिलेकडून २ किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे गावात एकाच कुटुंबातील दोन महिलांसह चौघांनी सामुदायिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बापलेकाला बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सुनेचा आणि सासूचा जागीच मृत्यू झाला आहे.
LGBTQ अॅपवर ओखळ झालेल्या एका व्यक्तीने 22 वर्षीय तरुणाची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याशिवाय पीडित तरुणावर हल्ला देखील करण्यात आला. या प्रकरणी पुणे पोलिसांकडून दोघांना अटक करण्यात आली आहे.
Chhatrapati Sambhajinagar Kidnapping Attempt : छत्रपती संभाजीनगरमध्ये ११ वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि तात्काळ हस्तक्षेपामुळे मुलीला वाचवण्यात यश आले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
केरळमध्ये एका ३२ वर्षीय विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या मुलीची हत्या करून आत्महत्या केली. सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी त्रास दिल्याचा आरोप आहे.
भीमाशंकरच्या जंगलात लुटल्याचा जेष्ठ नागरिकाने आरोप केला होता, मात्र पोलिसांच्या तपासात हा आरोप खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे. रिक्षा चालकाशी करार करून दर्शनासाठी गेलेल्या जेष्ठ नागरिकाने बनाव केल्याचे उघडकीस आले आहे.
कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. आरोपी मुलींना लिपस्टिक आणि जेल लावून अनैसर्गिक अत्याचार करत असे. आरोपी अनेक महिन्यांपासून मुलींवर अत्याचार करत होता.
पुण्यातील कात्रजच्या साई सिद्धी चौकात पानटपरीवर झालेल्या वादातून एका तरुणाचा खून झाला आहे. नाशिकचा असलेला २५ वर्षीय आर्यन साळवे या तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला. पोलिसांनी आरोपी धैर्यशील मोरेला अटक केली आहे.
दिल्ली विद्यापीठातील एका विद्यार्थिनीचा मृतदेह सिग्नेचर ब्रिजजवळील नदीत सापडला. तिने सुसाईड नोटमध्ये ब्रिजवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा निर्णय लिहिला होता
मुंबईत एका निवृत्त प्राध्यकापाला फेसबुकवरील मैत्रीणीने कोट्यावधींचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime news