कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक केली आहे. आरोपी मुलींना लिपस्टिक आणि जेल लावून अनैसर्गिक अत्याचार करत असे. आरोपी अनेक महिन्यांपासून मुलींवर अत्याचार करत होता.

Kalyan: कल्याण रेल्वे पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पकडून ताब्यात घेतलं आहे. हा नराधम मुलींना लिपस्टिक आणि जेल लावून अनैसर्गिक अत्याचार करत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. अरुण उत्तप्पा ( २८ रा वडाळा मुबंई ) असे या विकृत अटक आरोपीचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

रेल्वे पोलिसांनी यासंदर्भातील अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार दोन अल्पवयीन मुली या वडाळा परिसरात राहणाऱ्या असून नराधम आरोपी त्याच परिसरात राहत होता. रविवारी संध्याकाळी कल्याण रेल्वे पोलिसांनी रेल्वे परिसरात फिरणाऱ्या तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली.

दोन्ही पीडित लहान मुली ११ वर्षांच्या असून पोलीस चौकशीत नराधम अरुण याने दोन अल्पवयीन मुलींना फिरण्याच्या बहाण्याने कल्याण रेल्वे स्थानकात परिसरात आणले होते. मात्र कल्याण रेल्वे स्टेशनवर या तिघांना पाहून पोलिसांना संशय आला होता. त्यांनी नराधम अरुणसह या दोन्ही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

नराधम आरोपीकडून जेल आणि लिपस्टिक केलं जप्त

नराधम आरोपी हा लहान मुलींना लिपस्टिक आणि जेल लावून त्यांच्यावर अत्याचार करत असायचा. आरोपी हा अनेक महिन्यांपासून पिढीत मुलींवर अत्याचार करत असल्याची माहिती पोलिसांकडून समजली आहे. कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी सांगितलं की, पीडित मुली आणि आरोपी हा वडाळा परिसरात राहणार असल्यामुळं हा गुन्हा वडाळा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. नराधम आरोपीकडून जेल आणि लिपस्टिक जप्त करण्यात आले आहे.